Headlines

अभिनेते अशोक सराफ यांनी सैराट या चित्रपटाबद्दल मांडले परखड मत, म्हणाले त्यात नवीन … !

सगळ्यांचे लाडके अशोक मामा यांचा 4 जून रोजी 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्यावर सध्याचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशोक सराफ हे असे अभिनेता आहेत ज्यांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमृष्टीपासून ते अगदी आताच्या आधुनिक इंडस्ट्रीचा प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. त्याच्या वयाच्या पंचाहत्तरी सोबतच त्यांच्या इंडस्ट्रीतल्या कारकिर्दीला देखील 50 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीत होणारे बदल अगदी जवळून पाहिले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मुलाखती घेण्यात आल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या या 50 वर्षांच्या कारकिर्दीत घडलेले अनेक प्रसंग, किस्से माध्यमांशी शेअर केले.

यावेळी त्यांनी पूर्वीचे चित्रपट तसेच आताचे चित्रपट यांच्यातील फरक सांगितला. इतके वर्ष इंडस्ट्रीचा तसेच नाटकांचा अनुभव असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांची नस बरोबर माहित असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन समजते. अशोक मामांच्या चित्रपटांना तुफान गर्दी असायची. पण अचानक तमाशापटाचा काळ सुरु झाला. त्यामुळे लोक थिएटर सोडुन तमाशाच्या फडाकडे वळु लागले.

त्यावेळी अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने पुन्हा मराठी प्रेक्षकांना सिनेमांकडे खेचून आणल्याचे अशोक मामांनी सांगितले. त्यांच्या मते त्यांच्या व लक्ष्मीकांत बेर्डेंच्या जोडीने तेव्हा मराठी सिनेसृष्टी खऱ्या अर्थने जीवंत ठेवली होती. तेव्हाचे चित्रपट आणि आताचे चित्रपट यांत आधुनिकता सोडल्यास फारसा फरक नाही.

सध्याचा मराठीतला सर्वात हिट चित्रपट सैराटच्या विषयात तसं काही नावीन्य नव्हतं पण त्याची ग्रामीण पार्श्वभूमी, मांडणी आणि धक्का देणारा शेवट तोही ग्रामीण भागातला, हे महत्वाचे गुण होते, असं सैराटबद्दल अशोक सराफ म्हणाले.
अशोक मामांनी त्यांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 250 हून अधिक चित्रपट केले. नाटकांमध्ये काम केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्याच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीची आठवण म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !