Headlines

राणादा आणि अंजली बाईं लग्नापूर्वीच गेले लंडन ट्रीपला, पहा त्यांचे फोटोज !

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील मुख्य भूमिकेतील कलाकार कायमच आपल्या आवडीचे असतात. त्या मालिकांमध्ये त्यांचं खुलणारं प्रेम आणि प्रसंग काल्पनिक असले तरी प्रत्यक्ष जीवनात ते घडल्यासारखे अनेकदा भासतात. या कलाकारांची ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहून ऑफस्क्रीन देखील हे कलाकार एकत्र असावेत असं काही वेळेस आपल्याला वाटतं.

तसंच एका आवडत्या मालिकेमधील कलाकार ऑनस्क्रीन तर एकत्र होतेच आता ते ऑफस्क्रीन देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठी मालिकेमध्ये राणादा आणि पाठक बाई हे दोन कलाकार दाखवण्यात आले होते.

ही मालिका संपली असली तरी त्या मालिकेतील हे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीचे होते. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर हे दोघे लग्नापूर्वी लंडन ट्रिपचा आनंद घेताना दिसत आहेत.

मे महिन्यात अक्षयाआणि हार्दिक यांनी साखरपुडा करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. अनेक मराठी कलाकार तसेच त्यांच्या मालिकेतील मित्र परिवार देखील त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होता. लवकरच या दोघांचे लग्न होणार असून त्यापूर्वीच हे दोघे लंडन ट्रीपला एकत्र गेल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

या ट्रिपचे फोटो ते स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड करत आहेत. लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो ते अपलोड करत एकमेकांना टॅग करत आहेत. हार्दिक जोशीने एक व्हिडीओ अपलोड केला होता, त्यात अक्षया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत व्हिडीओमध्ये हाय हॅलो करताना दिसले. दोघांचा एक फोटो अपलोड करत त्याने अक्षयाला टॅग करत #LONDON असं टाकलं होतं. दोघे ही या फोटोमध्ये फार छान दिसत आहेत.

लंडन ट्रिपला थोडं फिरल्यानंतर हार्दिकने स्वतःचा फोटो अपलोदड करत basic, let’s go, shooting time असे स्टिकरर्स वापरले आहेत. या ट्रिपवरून परत येताच हे दोघे ही लग्नाच्या तयारीला लागणार आहेत, पुण्यामध्ये या दोघांचा लग्न सोहळा पार पडेल असं म्हंटल जात आहे.


अक्षय हार्दिक च्या लग्नाचा लूक?, या लग्नाला कोणते कलाकार हजेरी लावणार?, लग्न कोणत्या दिवशी असणार? याची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःचा हॅशटॅग देखील बनवला आहे आणि स्वतःचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये #अहा हा हॅशटॅग वापरतात.

हे दोघे ही एकमेकांसोबतचे फोटो पूर्वीपासूनच शेयर करत आले आहेत. त्यांच्यातील खास मैत्री चर्चेचा विषय होऊ पाहत होती पण या दोघांनी यावर कधी ही उघडपणे भाष्य केले आहे. त्यांनी साखरपुडा करत सर्व विषयांना पूर्णविराम दिला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !