Headlines

रानबाजार बद्दल कुशल बद्रिके कडून प्राजक्ता माळी बद्दल ही चूक, मागितली तिची जाहीर माफी !

प्राजक्ता माळी ही मराठी अभिनेत्री सध्या प्रचंड गाजत आहे. मराठी वेबसिरीज ‘रानबाजार’ मधील तिचा बोल्ड अभिनयामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून या वेबसिरीज संबंधी अनेक पोस्ट, फोटो, व्हिडीओ तिने शेयर केले आहेत. काही नेटकऱ्यांनी तिचा बोल्ड अंदाज पाहून तिला ट्रोल केले, तर काही जणांनी तिचा अभिनय पाहून तिची वाहवा केली आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक मराठमोळ्या अभिनेत्री आहेत, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे, सुरेखा कुडची अशा एकापेक्षा एक जबरदस्त अभिनेत्रींनीं या वेबसिरीजमध्ये अभिनय केला आहे.

मराठीतील वेबसिरीजमध्ये पहिल्यांदाच असा बोल्ड अंदाज दाखवण्यात आला आहे. या वेबसिरीजचे आणि त्यामधील नायिकांच्या अभिनयाचे नेटकऱ्यांनी तसेच अनेक कलाकारांनी देखील कौतुक केले आहे. अशातच एका कलाकाराने सोशल मीडियावर या वेबसीरिजचे आणि कलाकारांचे कौतुक करत पोस्ट शेयर केली आहे, पण ही पोस्ट सध्याचा चर्चेचा विषय ठरली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता कुश बद्रिके याने या ‘रानबाजार’ वेबसिरींजमधील कलाकारांचे कौतुक करता फोटो व कॅप्शन पोस्ट केले आहे.परंतु, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने सर्व कलाकारांचा उल्लेख केला पण प्राजक्ताच्या नावाचा उल्लेख करणे राहून गेले आणि तिला त्या पोस्टमध्ये टॅग देखील केले नाही. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कुशल लिहितो की, “”रान बाजार” एक कमाल web Series., Web series ची Typical गणितं मोडत, समाजाच आणि राजकारणाच वास्तव चित्र दाखवणारी ही Series “कथेच्या नायकातल, अती-सामान्यपण, आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत रहाते”.“System नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते” हेच खर.

अभिजीत पानसे , तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार ह्यांचा भाराऊन टाकणारा Performance ह्या Series चा आत्मा ठरतो.Personally मला ही Web series खुप आवडली नक्की बघा “रान बाजार”On Planet Marathiआणि जाता जाता….. “ते कुंडी लगालो सय्यां” गाण काहीच्या काही केलय”.

या कॅप्शन नंतर नेटकऱ्यांनी जेव्हा याबद्दल चर्चा सुरु केली तेव्हा कुशलच्या हे निदर्शनास आले आणि त्याने एका बातमीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने प्राजक्ताची जाहीर माफी मागितली आहे. त्या कॅप्शनमध्ये कुशलने लिहिले आहे की, “मी समस्त news media आणि विशेष प्राजक्ता माळी चे fans यांची क्षमा मागतो, प्राजक्ताच नाव लिहायचं चुकून राहील.

प्राजक्ता, पांडू ह्या सिनेमातील माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा आहे,
तुमच्या ह्या news मुळे आता ती बहुतेक “दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जून जे उटणं, तेल वगैरे gift म्हणून पाठवते ते पाठवणार नाही”, तूम्हाला त्याचं पाप लागेल आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली अंघोळ चुकेल. 😥😥 प्राजक्ता तू मस्त काम केलस यार. तुला personally sorry म्हणतो.

बाकी सगळ्या कलाकारांनीच काय तर त्या घुबडाने सुद्धा भारी काम केलंय. तर plz “रान बाजार” बघा.”
माफी मागत, विनोदी अंदाजात आणि प्राजक्ताचे कौतुक देखील करता त्याने हि पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !