Headlines

अख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा बाळासाहेब आहे तरी कोण, जाणून घ्या !

चांडाळ चौकडीच्या करामती म्हंटलं कि कळत नकळत आपल्या ओठांवरती नाव येत ते म्हणजे दारू पिणारा बाळासाहेब. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला बाळासाहेबांबद्दल तुम्हाला नक्कीच माहित नसतील. चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधून बाळासाहेबांनी अख्या महाराष्ट्राला हसून हसून वेड केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया बाळासाहेबांन बद्दल !
बाळासाहेबांचे खरे नाव आहे श्री. भरत पांडुरंग शिंदे. त्यांची जन्मतारीख ३/५/१९८३ असून त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कांबळेश्वर या गावी झाला आहे. त्यांचे वय ३७ वर्ष आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर ते फक्त १२ शिकलेले आहेत पण भाषेवरती त्यांचं चांगलंच प्रभुत्व आहे.

त्यांचं शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा कांबळेश्वर, ता. बारामती, रिमांड होम बारामती, वसतिगृह शिक्षण, सातारा. कर्मवीर विद्यालय सांगवी, श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर या ठिकाणी झाले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव ‘दुर्गा भरत शिंदे’ आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या ग्रामपंचायत कांबळेश्वरच्या सरपंच आहेत आणि सोबतच उत्तम गृहिणी आहेत. आमच्या टीम ने त्यांना काही प्रश्न विचारले चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल !
दारू पिणाऱ्याची भूमिका तुम्ही उत्तम निभावू शकता हे तुमच्या कसे लक्षात आले ? प्रत्येक माणसामध्ये काहीतरी विशिष्ट गुण असतो फक्त तो ओळखता आला पाहिजे. २००१ साली पुण्यातील मगरपट्टा सिटी मध्ये राष्ट्रीय सेवा दलाच्या हीरक महोत्सवानिमित्त पथनाट्याच्या स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्यामुळे १२ राज्यातून ५६ पथनाट्य ग्रुप सहभागी झाले होते. त्या स्पर्धेमध्ये आमच्या ग्रुपचा प्रथम क्रमांक आला होता. त्या पथनाट्यात मी दारूड्याची भूमिका केली होती तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी दारू पिणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारू शकतो.
तुमच्या वैयक्तिक जीवनात दारूला स्थान आहे का ? माझ्या कुटुंबात आई, वडील, मोठा भाऊ, २ बहिणी आणि मी सर्वात लहान. आम्ही लहान असताना वडील दारू प्यायचे आणि मी निरीक्षण करायचो. घरातील एका दारुड्या व्यक्तीमुळे घरातील इतर सदस्यांचे किती हाल होतात, त्यांची किती कुचंबणा होते हे मी पाहिले आहे.

त्यातील मी फक्त निरीक्षण केले आणि अभिनय घेतला. पण मी कधी दारूच काय तर साधी सुपारी सुद्धा खाल्ली नाही. मी व्यसनमुक्तीची सामाजिक उपक्रम घेत असतो. त्यासोबत मी एक किर्तनकार आहे.यामध्ये मी भक्तीपर आणि समाजप्रबोधन या विषयावरती कीर्तन करतो.
बाळासाहेब हे पात्र आणि भरत यांच्या स्वभावमध्ये काही साम्य आहे का ? भरत ही एक व्यक्ती आहे आणि मला दैनंदिन जीवनात जशी परिस्थिती निर्माण होईल तसे वागावे लागते. तर बाळासाहेब पात्र करताना कधी खोटं बोलावं लागतं. तर कधी नवरा-बायकोमध्ये किंवा दोन गटांमध्ये भांडण लावावी लागतात. त्यामुळे खऱ्या आयुष्यात कधी कोणाची शिवी खाल्ली नाही पण बाळासाहेब हे पात्र करताना प्रेक्षकांच्या कमेंटमध्ये शिव्या सुद्धा खाव्या लागतात.
आम्ही असं ऐकलं आहे की तुमची पत्नी गावच्या सरपंच आहेत हे खरं आहे का? सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाला काय संदेश द्याल ? हो माझी पत्नी कांबळेश्वर गावची विद्यमान सरपंच आहे. माझ्या घराला कुठलाही राजकीय वारसा नसताना मला सर्वांनी खूप आग्रह करून विनंती करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला लावला व वार्ड ४ मध्ये ७७५ पैकी ५७४ मते मिळवून माझी पत्नी गावची सरपंच झाली. याचे कारण म्हणजे मी भरत शिंदे, रामदास जगताप, सुभाष मदने, सचिन खलाटे आणि २०/२५ मुलांची फळी गेल्या पंचवीस वर्षांपासून गावात सामाजिक काम करीत आलो आहोत आणि याच कामाची दखल गावातील लोकांनी घेऊन माझ्या पत्नीला सरपंच केले.
मला एकच संदेश द्यायचा आहे फक्त तुम्ही समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतुने काम करत राहा समाज चांगल्या कामाची दखल घेत असतो.

बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील तुम्ही काम केलं होतं ? हो, कलर्स मराठी वरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये बाळुमामांचे दोन गण होते दाजी आणि भिकु. त्यातील दाजी मी साकारला आणि भिकु नावाचे पात्र रामभाऊनी साकारले !
भविष्यात आपले नवीन कोणते प्रोजेक्ट येणार आहेत ? आम्ही आता गावाच्या विकासावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. तरी मी रामभाऊ, सुभाषराव, विष्णू भारती सर यांना घेऊन एक चित्रपट निर्मिती करावी असा विचार करत आहे. काही ५/६ लोक आमच्या अभिनयाच्या जोरावर ती एक कोटी रुपये गुंतवण्याच्याची तयारी दाखवत आहेत. पण तशी स्टोरी मिळाली तर नक्कीच तो सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहोत.
तुमच्या खऱ्या आयुष्यात रामभाऊं आणि सुभाषराव यांचे स्थान कसे आहे ? मी रामभाऊ, सुभाषराव लहानपणापासूनचे मित्र. आमच्या मैत्रीत अनेक वेळा वैचारिक तंटे होतात. पण त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर होऊ देत नाही. आणि मला कलाकार म्हणून पुढे आणण्यात सुभाषराव आणि रामभाऊ यांचा खूप मोठा वाटा आहे. आमच्या सारखी मैत्री सर्वांची असावी !
बाळासाहेबांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *