Headlines

रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील !

मित्रांनो झी मराठी वाहिनी वरील रात्रीस खेळ चाले ही मालिका तुम्हाला चांगलीच माहित असेल. त्या मालिके मधून घराघरात पोचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर चे तुम्ही चाहते ही असाल. आज आम्ही तुम्हाला अपूर्वा बद्दल अश्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही माहिती वाचून तुम्हालाही अपूर्वा बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी कळतील. चला तर मग जाणून घेऊया तिच्या बद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी.
अपूर्वा चा जन्म १७ डिसेंबर १९८८ साली झाला. कट्टर चाहते असाल तर तारीख लक्षात ठेवा आणि तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला विसरू नका. तिचे वडील हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये तर आई सरकारी कंपनी मध्ये काम करायची. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. तिला सर्व प्रेमाने अपू म्हणून हाक मारतात. अपूर्वा ने तिचे शालेय शिक्षण दादर च्या किंग जॉर्ज म्हणून घेतले आणि नंतर वांद्रयाच्या नॅशनल कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले. तिने दादर च्या रुपारेल कॉलेज मधून मॅनेजमेंट स्टडीज मध्ये ग्रॅजुएशन केले आहे.
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याअगोदर तिने एच डी एफ सी बँकेत बॅक ऑफिस एक्सएक्युटीव्ह म्हणून काम केले आहे. त्यानंतर तिने स्वतःची इव्हेंट कंपनी सुरु केली आणि अनेक फॅमिली आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स ऑर्गनाईज केले. तसेच तिने लोढा बिल्डर्स सोबत ही काम केले आहे.
अपूर्वाला अभिनयाच्या क्षेत्रात पहिला ब्रेक मिळाला तो झी मराठी च्या आभास हा ह्या मालिकेमधून. विश्वास बसणार नाही, पण तिला तिचा पहिला ब्रेक मिळाला तो फेसबुक अकाउंट मुळे! डायरेक्टर रसिका नामजोशी ह्यांनी तिचे फेसबुकवरचे फोटो पाहिले आणि तिला त्यांच्या मालिकेमध्ये रोल ऑफर केला. रसिका नामजोशी अपूर्वावर प्रभावित झाल्या होत्या. पुढे त्यांनीच तिला अभिनयाच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी मदत केली. आभास केल्यानंतर तिला स्टार प्रवाह वरच्या आराधना मालिकेची ऑफर आली. बरोबरच तिने एका पेक्षा एक ह्या डान्स रिऍलिटी शो मधेही भाग घेतला आहे.
आभास हा ह्या मालिके नंतर तिने “विला” ह्या हिंदी चित्रपटामध्ये काम केले. तसेच “इश्क वाला लव्ह”, “भाखरखाडी ७ किमी” ह्यासारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. पण अपूर्वा घराघरात पोचली ती तिच्या रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेमुळे. त्यामध्ये तिची आणि अण्णा नाईकांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. ह्याच मालिकेमुळे अपूर्वाला खूप प्रसिद्धी मिळाली.
तिच्या चाहत्यांचा हृदयाचा ठोका चुकवणारी बातमी म्हणजे अपूर्वा चे लग्न झालेले आहे. अपूर्वाने १० डिसेंबर २०१४ रोजी तिचा मित्र रोहन देशपांडे सोबत लग्नगाठ बांधली. रोहन देशपांडे हा शिवसेनेची युथ विंग, युवासेनेचा माहीम दादर प्रभादेवी विधानसभा क्षेत्राचा विभाग अधिकारी आहे. रोहन व्यवसायाने बिल्डर असून अपूर्वा आणि रोहन लग्ना अगोदर ८ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते.
अपूर्वाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी –
१) अपूर्वाला ड्रायविंग करायला फार आवडते. तीला सोलो ट्रिप्स वर जायला आवडते आणि फॅमिली सोबत जायचे असल्यास ती स्वतःच गाडी चालवते.
२) अपूर्वा ला खोटं आणि खोटं बोलणारे अजिबात आवडत नाहीत. तसेच तिला वक्तशीर पणा नसलेले म्हणजेच वेळेवर न पोचणारे लोकं ही आवडत नाहीत.
३) अपूर्वा खूप मोठी खव्वयी आहे. तिला खायला खूप आवडतं. तिला काहीही विचारावं पण डायटिंग करायला सांगू नये असं ती म्हणते.
ह्या होत्या अपूर्वाबद्दल काही कमी माहिती असणाऱ्या गोष्टी. लेख आवडला असेल तर लाईक करून नक्की शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *