Headlines

मृणाल दुसानिस काय करतेय आता, काय करतो नवरा, ते का राहतात वेगळे, जाणून घ्या !

मित्रांनो तुम्ही “माझिया प्रियाला प्रीत कळेना” ही मालिका पहिली असेल तर तुम्हाला मृणाल दुसानिस कोण आहे हे नक्कीच माहिती असेल. एकता कपूर ची ही मालिका झी मराठी वर चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्याहीपेक्षा लोकप्रिय झाली ती समिका म्हणजे मृणाल दुसानिस. मृणाल ची ही पहिलीच मालिका होती. ह्या मालिकेमुळे मृणाल ची खूप मोठी फॅन फॉलोईंग तयार झाली.
मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनयामुळे तिने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिने कलर्स मराठीवर “अस्सं सासर सुरेख बाई” ह्या मालिकेत जुई ची भूमिका केली होती. ही मालिका सुद्धा खूप चालली. त्यानंतर कलर्स मराठीवर     “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” हि मालिका सध्या सुरु आहे. तिने चिन्मय मांडलेकर सोबत “तू तिथे मी” ही मालिका ही केली आहे. दोन्ही मालिका खूप हिट ठरल्या.
तुम्ही सुद्धा मृणालचे फॅन असाल तर आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हाला तिच्याबद्दल चांगली माहिती होईल. मृणाल चा जन्म २० जून १९८८ साली नाशिक येथे झाला. तिने मराठा हायस्कुल मधून शिक्षण घेतल्यानंतर तिने HPT कॉलेज मधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. तिने पत्रकारितेमध्ये मास्टर्स केले आहे.
मृणालने २०१५ मध्ये नीरज मोरे ह्याच्याशी लग्न केले असून नीरज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लग्नानंतर मृणाल ला नीरजसोबत अमेरिकेत जायची संधी चालून आली होती. पण मृणालने करियर साठी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही एकमेकांच्या आवडी-निवडीचा आणि व्यवसायाचा आदर करतात त्यामुळे दोघेही आनंदी आहेत.
कलर्स मराठीवरच्या “अस्सं सासर सुरेख बाई” ह्या मालिकेसाठी ती अमेरिकेत जाऊ शकली नाही. नीरज ची नोकरी अमेरिकेत असल्यामुळे नीरज अमेरिकेतच राहतो. तिची सध्या कलर्स मराठीवर “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” हि मालिका सुरु आहे.
मृणाल ने आता पर्यंत माझिया प्रियाला प्रीत कळेना मध्ये शमिका, तू तिथे मी मध्ये मंजिरी, असं सासर सुरेख बाई मध्ये जुई ची भूमिका केली आहे. तसेच तिने आम्ही सारे खव्वये ह्या मालिकेत अँकरिंग ही केलं आहे. मृणालने रक्तपुष्प हे नाटक ही केले आहे. तसेच मृणालने २०१३ मध्ये आलेल्या श्रीमंत दामोदर पंत ह्या चित्रपटामध्ये सुमन ची भूमिका साकारली आहे. ह्या चित्रपटामध्ये सुनील बर्वे, अलका कुबल, भरत जाधव अशी मोठी स्टार कास्ट होती.
मृणाल अभिनयच नाही तर डान्स ही खूप छान करते. मृणाल झी मराठी वरच्या “एका पेक्षा एक अप्सरा आली” ह्या रिऍलिटी डान्स शो मधेही ती सहभागी झाली होती. तिने धुंद हवा नावाचा म्युझिक व्हिडीओ ही केला आहे. हा विडिओ युट्युब वर उपलब्ध आहे. ती स्वतः नाशिककर असल्याचा अभिमान बाळगते.
मृणाल आणि नीरज यांना आमच्या टीम कडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ईश्वर सुख शांती भरभराटी देवो. लेख आवडला असल्यास लाईक करा आणि शेयर करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *