Headlines

प्राजक्ता माळी २०२०मध्ये लग्न करायला तयार पण तिला हवाय असा जोडीदार !

गेल्या दोन वर्षात बरेच मराठी कलाकार बोहल्यावर चढले. अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरे, स्मिता तांबे, नेहा पेंडसे यांसारख्या नामवंत कलाकारांनी गेल्या दोन वर्षात लग्नगाठ बांधली आहे. आता या यादीत अजून एक नवीन नाव सहभागी होणार आहे ते म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी.
झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमशी खास गप्पा मारल्या. त्यावेळी तिने तिच्या लग्नाला बद्दलच्या योजनेबाबत काही गोष्टी शेअर केल्या. प्राजक्ता ने सांगितले की २०२० मध्ये कदाचित मी लग्न करू शकते.
कारण बऱ्याच दिवसांपासून माझे पालक माझ्या लग्नासाठी मागे लागले आहेत. त्यामुळे आता शेवटी मी त्यांना होकार दिला. माझे कधीच कोणतेही प्रेम प्रकरण नसल्यामुळे माझ्या आयुष्याचा साथीदार शोधण्याची जबाबदारी मी माझ्या आईवडिलांवर सोपवली. आणि माझी आई वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्यासाठी मुलगा शोधण्यास सुरू झाली.
प्राजक्ता पुढे म्हणाली की, तिच्या आईने तिचे नाव एका वैवाहिक वेबसाईटवर नोंदवले आहे. एवढेच नव्हे तर त्या वैवाहिक वेबसाईटवरील काही प्रोफाइल तिच्या आईने शॉर्टलिस्ट केले आणि त्या मुलांचे फोटो मला दाखवले.
जेव्हा प्राजक्ताला तिच्या भावी जोडीदार मध्ये कोणते गुण असावेत अशी विचारणा केली तेव्हा ती म्हणाली, मला फक्त एक जोडीदार पाहिजे जो मला नीट समजू शकेल आणि मी जशी आहे तशीच मला तो स्वीकारेल. शिवाय मी ज्या क्षेत्रात काम करते तेथे वेळेचे कोणतेच बंधन नसते. त्यामुळे त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला माझ्या शूटिंगच्या वेळांचे किंवा माझ्या वेळापत्रकांसंबंधी कोणतीही अडचण येऊ नये.
प्राजक्ताने असेही सांगितले की तिला जोडीदार म्हणून अभिनेता हवा असे काही नाही पण जो कोणी व्यक्ती असेल त्याने तिच्या व्यवसायाबद्दल किंवा ति ज्या क्षेत्रात काम करत आहे त्याबद्दल आदर बाळगला पाहिजे अशी तिची अपेक्षा आहे.
प्राजक्ता चे म्हणणे आहे की यावर्षी जरी माझा जोडीदार निवडला तरी लग्नासारखे मोठे पाऊल उचलले आधी मला त्याची ओळख करून घ्यायची आहे. मी जो व्यक्ती निवडेन त्याने फक्त मी अभिनेत्री आहे म्हणून माझ्याशी लग्न करू नये. प्राजक्ताला २०२० हे वर्ष लग्नासाठी खूप चांगले वाटते.
प्राजक्ताला जेव्हा तिच्या क्षेत्रातील आदर्श जीवन साथी असा असावा असे उदाहरण कोण विचारले गेले तेव्हा ती हसली आणि म्हणाली दक्षिण आणि बॉलीवुड इंडस्ट्रीमधले राणा दग्गुबती, गुरु रंधावा, विकी कौशल क्रश आहेत. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जितेंद्र जोशी किंवा प्रसाद ओक जर अविवाहित असते तर त्यांच्याशी मला लग्न करायला नक्कीच आवडले असते असे ती म्हणाली !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *