Headlines

प्राजक्ता माळीच्या मादक अदा, साडीवरील हॉट फोटोशूट मुळे सोशल मीडियावरील वातावरण गरम, पहा फोटोज !

अभिनेत्री प्राजक्ता माळी हल्ली वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिचे चित्रपट, वेब सिरीज , फोटोशूट हे चर्चेचा विषय असतात. टीव्ही इंडस्ट्री ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. प्राजक्ता अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटो पोस्ट करत असते.

आता पुन्हा एकदा तिने तिच्या नुकत्याच करण्यात आलेल्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहे. हे फोटो काळ्या रंगाच्या साडीतील आहेत. त्या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसते. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो खूप व्हायरल होत आहे. प्राजक्ताने या साडीवर नो ब्लाऊज लूक केला आहे.


तिची साडीवरची ही हटके स्टाइल अनेकांना घायाळ करत आहे. काळ्या रंगाच्या साडीवर सोनेरी नक्षी काम असल्यामुळे तिने सोनेरी रंगाचा ट्यूब ब्लाऊज घातला आहे. या साडीला साजेसे दागिने तिचे सौंदर्य खूलवत आहेत.


प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना त्याला मेरे तो नेनौं में किरणों के पॉखी असे कॅप्शन दिले आहे. तिने हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स , कमेंटचा धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.


मध्यंतरी काय तो डोंगर, काय ती झाडी हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता त्यावरुन काहींना प्राजक्ताला काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य , प्राजक्ता अतिसुंदर अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचे सूत्रसंचालन करते.


तसेच तिची काही दिवसांपूर्वी रानबाजार ही वेब सिरीज स्ट्रिम झाली त्यातील तिच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले. त्या भूमिकेसाठी प्राजक्ताने १५ किलो वजन वाढवले होते. जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेत तिने मेघना ही भूमिका साकारली, तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकरने काम केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !