Headlines

आपल्या मुलांच्या नावाने पोस्टात खोला हे खाते महिन्याला मिळतील २५०० रुपये, जाणून घ्या योजना !

मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आपण अनेकदा त्यांच्या नावाने पैशांची सेव्हिंग करत असतो. पण ते काही वेळेस त्या स्किम फसव्या निघतात आणि आपण साठवलेले सर्व पैसे त्या स्किममध्ये बुडतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पैसे सेव्हिंगल करताना कोणत्याही स्किमची योग्य पडताळणी केल्याशिवाय ते भरु नये.

जगात प्रत्येकालाच कमी जोखमेत जास्त फायदा हवा असतो. त्यामुळे पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम म्हणजेच एमआईएसमध्ये कोणही एकदा पैसे लावुन दर महिन्याला व्याजरुपी फायदा मिळवु शकता. पोस्टाच्या या अकाउंट मध्ये खुप फायदा आहे.

१० वर्षांहुन अधिक वय असलेल्या मुलांचे हे खाते उघडले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने जर त्यांच्या मुलांच्या नावाने हे खास खाते उघडले तर दर महिन्यात मिळणाऱ्या व्याजावर ती व्यक्ती त्यांच्या मुलांची ट्युशन फि आरामात भरु शकतो. या स्किमची मॅच्युरिटी १५ वर्षांची आहे. ५ वर्षांनंतर ते बंद करता येते.

असे उघडा खाते – कोणतीही व्यक्ती पोस्टात जाऊन हे खाते उघडु शकते. या खात्यात तुम्ही कमीत कमी १००० रुपये ते जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये जमा करु शकता. सध्या या स्किममध्ये व्याज दर ६.६ टक्के आहे. ज्य़ा व्यक्तीचे मुल १० वर्षांहुन अधिक वयाचे असेल ती त्यांच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडु शकतात आणि जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाचे वय १० हुन कमी असेल तर तुम्ही पॅरेंट अकाउंट सुद्धा उघडु शकता.

असे असेल गणित – एखाद्या व्यक्तीचे मुल १० वर्षांचे असेल आणि तो त्याच्या नावावर २ लाख रुपये जमा करत असेल तर दर महिना तुम्हाला ६.६ टक्के दराने व्याज म्हणजे ११०० रुपये मिळतील. ५ वर्षांत हे व्याज ६६ हजार रुपये होईल. आणि शेवटी तुमचे २ लाख रुपये परत मिळतील. व्याजरुपी मिळणारी ११०० रुपये रक्कम ही मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

दर महिना मिळतील एवढे पैसे – या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे खाते सिंगल किंवा तीन एडल्ट व्यक्ती मिळुन सुद्धा खोलु शकतात. या खात्यात एखादी व्यक्ती ३.५० लाख रुपये जमा करते तर त्याला वर्तमान व्याज दराने दर महिना १९२५ रुपये मिळतील. मिळणारी रक्कम ही शालेय विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पुरेशी रक्कम आहे. तर या स्किम मध्ये ४.५ लाख रुपये जमा केल्या, दर महिना २४७५ रुपयांचा लाभ होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !