Headlines

फक्त या कारणामुळे ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’च्या जागी ‘वीणा जगताप’ ?

लॉकडाऊनमुळे मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण देखील थांबलं होतं. पण लॉकडाऊन उठताच जुन्या मालिकांसमवेत काही नवी मालिका ही सुरु झाल्या. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी पर्वणीचं मिळाली. पण सर्वांनाच न्यू नॉर्मलला स्वीकारत चित्रीकरण करावं लागत आहे, सोबतच येणाऱ्या अडचणींवर देखील खंबीरपणे मात्र करावी लागत आहे. या नव्या मालिकांच्या यादीमध्ये सोनी मराठीवर ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका देखील सुरु झाली.

अभिनेत्री अल्का कुबल या मालिकेच्या निर्मात्या आहेत. या मालिकेला कोरोनाकाळात अनेक अडचणींचा सामोरं जावं लागलं. आधी या सेटवर कोरोना पसरला होता, मग त्यातूनच ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई यांच निधन, पाऊसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींवर मात करत ही मालिका आता पुढे सुरु आहे.

पण या मालिकेमध्ये एक मोठा बदल होत आहे तो म्हणजे या मालिकेतील मुख्य पात्र आर्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत होती, पण आता तिच्या जागी बिग बॉस 2′ फेम अभिनेत्री वीणा जगताप ही भूमिका साकारणार आहे. प्राजक्ताने ही मालिका सोडली असून यामागे कारण देखील आहे.
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर म्हणजेच गेल्या ३ महिन्यांपासून या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्याजवळ सुरु झालं असून मालिकेतील आर्या हे महत्त्वाचं पात्र प्राजक्ता गायकवाड साकारत होती. प्राजक्ताने यापूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाईंचा भूमिकेत होती आणि ही भूमिका तिने अगदी लिलया पेलली होती. त्यामुळेचं ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतल्या आर्या या मुख्य भूमिकेसाठी प्राजक्ताची निवड झाली.

पण या तीन महिन्यातच तिच्या वर्तणुकीचा त्रास हा निर्मात्यांपासून संपूर्ण मालिकेच्या टीमला होऊ लागला. ही मालिका आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार होणाऱ्या वादाचं रूपांतर हे तिने मालिका सोडण्यात झालं आहे. मालिका, त्याच कथानक, सेट व इतर सर्व गोष्टी पाहता कोणताही कलाकार एकदम मालिका सोडून देण्याचा निर्णय घेत नाही. पण या तिच्या वर्तनाने सोनी मराठी चॅनलचे पदाधिकारी आणि निर्मातेही नाराज आहेतच.

त्यामुळे तिच्या जागी दुसरी व्यक्ती शोधणं महत्त्वाचं होत आणि लगेचच वीणा जगताप हिच्याशी संपर्क साधून या भूमिकेसाठी तिची मंजुरी मिळवली. वीणा जगताप समवेत या मालिकेच्या पुढील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. वरील सर्व प्रकाराबद्दल मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल म्हणाल्या, “गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण युनिट सातत्याने तिच्या आडमुठ्या वागण्याला सहन करत होतं. आजवर तिच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं.

तिच्या खोलीत गेल्यानंतर चार-चार तास बाहेर न येणं. सीन लागून सर्व कलाकार तयार असूनही सर्वांना वाट बघायला लावणं आणि चित्रीकरणासाठी तारीख देऊनही बाहेरच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं. याला सुपारी म्हटलं जातं. वारंवार हे प्रकार होऊ लागल्यामुळे चित्रीकरणाचं नियोजन गडबडून जायचं. सेटवर शरद पोंक्षे, संग्राम साळवी, अनिकेत केळकर आदी अनेक कलाकार आहेत. यापैकी कुणालाही तुम्ही याबद्दल विचारु शकता.
सेटवरच्याच एक ज्येष्ठ कलाकारानेही मला तिच्याबद्दल सुरुवातीला ताकीद दिली होती, तरीही मी तिच्यावर विश्वास दाखवला पण तिने आपल्या वर्तनाने सगळ्यांनाच निराश केलं आहे. प्राजक्ताच्या जाण्याने सेटवरील शेवटची नकारात्मकता देखील आता दूर झाली आहे, आता आई काळूबाई सर्व मार्गी लावेल.’

मालिकेच्या सेटवर प्राजक्ताच्या या वागण्याबद्दल सर्वांकडूनच दुजोरा मिळाला. तिच्या अशा चुकीच्या वर्तनाबद्दलं तिला विचारले असता ती म्हणत असे हवं तर मालिकेतून काढून टाका….. मालिका सुरु करण्यापूर्वी कलाकारांसोबत काही नियम व अटींबद्दल करारपत्र केले जाते.

पण ही मालिका लॉकडाऊन मध्ये सुरु झाली असल्यामुळे करारपात्रासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध न झाल्याने करार करणे राहून गेल्याचे निर्मात्या अल्का कुबल यांनी स्पष्ट केले. प्राजक्ताने मालिका सोडल्यानंतर सोनी मराठीने निर्मात्यांना लगेचच वीणा जगतापचे नाव सुचवले. वीणाने होकार देतच ती सेटवर हजर राहिली व मालिकेचे चित्रीकरण सुरु केले. या प्रकरणावर अजून प्राजक्ता गायकवाडची प्रतिक्रिया मिळाली नाही. ती आल्यास आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोच करू !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !