Headlines

३० रुपयांनी सुरु केलेला OYOचा व्यवसाय ८ वर्षात पोहचला ७५ हजार करोड रुपयावरती, जाणून घ्या कसा !

आपलयाला जागोजागी ओयो हॉटेल्स दिसतात. कपल्समध्ये तर हे ओयो हॉटेल्स प्रसिद्ध आहेतच. हे ओयो हॉटेल्स २०१३ मध्ये सुरू झाले. या कंपनीने फक्त ८ वर्षात ७५ हजार कोटींचा व्यवसाय तयार केला आहे. या कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल आहेत. एक काळ असा ही होता जेव्हा रितेशच्या खिशात फक्त ३० रुपये होते. त्याचा पहिला स्टार्टअप, ओरावेल स्टेज पूर्णपणे फसला होता. तो पुढील जीवनात आपल्या करियरसाठी वाक्य करेल याचा बिलकुल अंदाज त्याला नव्हता. पण तरीही त्याने ‘OYO Rooms’ सारखी मोठी कंपनी तयार केली. मग हा ‘OYO रूम’ इतका मोठा ब्रँड कसा बनला? हे आपण आज जाणून घेऊया.

ओडिशामधील रायगड जिल्ह्यातील भीष्मटक येथे जन्मलेल्या रितेश अग्रवालने शाळेत असतानाच उद्योजक बनण्याचा निर्धार केला होता. कुटुंबातील सदस्यांच्या आग्रहावरून तो आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी कोटा येथे गेला. पण तिथे मात्र त्याला अभ्यास करावासा वाटला नाही. त्यामुळे त्याने आपला एक प्रवास सुरू केला. या दरम्यान, तो अनेक हॉटेल्समध्ये जाऊन त्यांना सांगायचा की ‘मला हॉटेल उद्योगाची एक मोठी समस्या सोडवायची आहे. कृपया मला तुमच्यासोबत राहू द्या.’ त्याच्या विनंतीनुसार, कोणी त्याला सवलत देत असे, तर कोणी त्याला फटकारून बाहेर काढत असतं.

रितेश यांनी त्यांच्या या प्रवासात सुमारे १०० ठिकाणांच्या विविध २०० हॉटेल्समध्ये राहिले. या दरम्यान त्यांनी हॉटेल उद्योगाची सर्वात मोठी समस्या पकडली. मग स्वतःच्या कल्पनेवर काम करत त्यांनी २०१२ मध्ये ओरावेल स्टेज नावाचा स्टार्टअप सुरू केला. या स्टार्टअप अंतगत ते स्वस्त हॉटेलमध्ये जात असत आणि तेथील खोल्या दिसायला छान बनवत असतं. यासह, ते त्या हॉटेलसाठी ग्राहक देखील शोधत असतं. मात्र, नंतर हे काम काही विशेष काम करू शकले नाही आणि त्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता त्याच्या खिशात फक्त ३० रुपये शिल्लक होते. ते दिल्लीच्या मॉथ मार्केटमध्ये बसून आपल्या भविष्याचा विचार करत होते.

त्यानंतर २०१३ मध्ये रितेशची थिअल फेलोशिपसाठी निवड झाली. या दोन वर्षांच्या कार्यक्रमात, फेलोना १ लाख डॉलर्स, म्हणजे सुमारे ७५ लाख रुपये मिळणार होते. याच वर्षी रितेशने ओयो रुम्स सुरू केले होते. ओयो रुम्सने स्वस्त हॉटेल्सला आपल्याशी जोडले. ते त्यांचे ब्रँडिंग, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी सपोर्ट, कस्टमर मॅनेजमेंट आणि त्याचे लूक आणि फील यासारख्या गोष्टी सुधारत असत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय २ पटीने वाढला. लवकरच ही संकल्पना लोकप्रिय झाली आणि ओयो रुम्सना अधिक निधी मिळू लागला.

ओयोने स्थान, गुणवत्ता आणि किंमत यावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती स्वीकारली. त्यांनी हॉटेल बनवण्याऐवजी आधीच अस्तित्वात असलेल्या हॉटेल्सशी भागीदारी केली. त्यांनी हॉटेल सर्च, सहज बुकिंग, चेक-इन चेक-आउट आणि ग्राहकांचे समाधान यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. या एग्रीगेटर बिझनेस मॉडेलमध्ये तंत्रज्ञानाने ग्राहक आणि भागीदार दोघांचेही काम सोपे केले. आता फक्त तीन क्लिक आणि पाच सेकंदात हॉटेल रुम बुक होते. ओयोने विद्यमान कर्मचाऱ्यांवर प्रचंड पैसा खर्च केला आणि त्यां कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले.

ओयो गरजेनुसार आपली रणनीती बनवत असे. भारतामध्ये जोडप्यांना खोल्या मिळणे खूप कठीण आहे, म्हणून ओयोने जोडप्यांना अनुकूल हॉटेल उपलब्ध व्हावे म्हणून प्रोत्साहन दिले. सध्या OYO रुम्स ८० देशांच्या ८०० शहरांमध्ये आपला व्यवसाय चालवत आहे. या स्टार्टअपमुळे रितेश अग्रवाल हे जगातील दुसरे सर्वात तरुण स्व-निर्मित अब्जाधीश म्हणून प्रसिद्ध आहेत.

आजकाल ओयो रूम IPO मुळे चर्चेत आहेत. ओयो पुढील आठवड्यापर्यंत IPO लाँच करण्यासाठी अर्ज करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी २०२१ च्या अखेरीस सुमारे ८ हजार कोटींचा आयपीओ जारी करू शकते. ओयो रुम्सचा सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये ६८ टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, हूरुन रिच लिस्ट 2020 नुसार, ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांची संपत्ती सुमारे ७ हजार कोटी आहे. भविष्यात, ओयो रूम देखील OYO टाउनहॉल, OYO वेडिंग्स, OYO हॉस्पिटॅलिटीसंबंधित व्यवसायात येत आपले प्रस्थ वाढवणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !