Headlines

हाताच्या या बोटामध्ये चांदीची अंगठी घालणे असते शुभ, रखडलेली कामे लागतील मार्गी, जाणून घ्या याबाबतची सर्व माहिती !

अनेक महिलांना दागिने घालण्याची फार हौस असते. सोन्याचे, चांदीचे, प्लॅटिनमचे असे वेगवेगळ्या धातूंचे दागिने परिधान केले जातात. या धातूंपैकी आपण चांदीच्या दागिन्यांविषयी आज बोलणार आहोत. मुख्यत्वे पायात चांदीच्या साखळ्या (एंकलेट्स), चांदीची अंगठी इत्यादी आपण परिधान करतो.

चांदीचे दागिने साज शृंगारासाठी वापरले जातात त्याचप्रमाणे ते सुख समृद्धीकारक देखील मानले जातात. पुराणात असे म्हटले जाते की, चांदीची उत्पत्ती भगवान शिव यांच्या डोळ्यांमधून झाली आहे, म्हणून ती परिधान केल्याने त्याचे बरेच फायदे होतात. जिथे चांदी असेल तिथे वैभव मोठ्या प्रमाणात नांदते.

सोबतच ज्योतिषांच्या म्हणण्याप्रमाणे चांदी हा नऊ ग्रहांपैकी शुक्र आणि चंद्र यांच्याशी जोडलेला धातू आहे. चांदी धारण केल्याने चांदी जलतत्त्व व कफ नियंत्रणात ठेवते. चांदीचे इतर देखील फायदे आहेत. आज आपण पाहूया की, कोणत्या बोटात चांदीची अंगठी घालावी आणि ती परिधान केल्याने कोणते फायदे आपल्याला होतात.

करंगळीमध्ये ह्या विधिपूर्वक घाला चांदीची अंगठी – कोणत्याही गुरुवारी रात्री चांदीची अंगठी पाण्यात घालून ती रात्रभर त्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी विष्णूच्या पायाजवळ ठेवा, देवाची पूजा करा. देवाची पूजा करून झाल्यानंतर त्या अंगठीला चंदन लावा, अक्षता चढवून दिवा दाखवून पूजा करा. त्यानंतर ती अंगठी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये घालावी.

चांदीची अंगठी परिधान केल्यास मिळू शकतात हे फायदे – १. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीची अंगठी परिधान केल्याने शुक्र व चंद्र शुभ परिणाम देतात. सौंदर्य वाढते आणि डाग देखील दूर होतात. २. चांदीची अंगठी परिधान केल्याने डोके शांत राहते. जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर या बोटामध्ये अंगठी घालणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे तुमचा रागावर देखल नियंत्रण राहते.

३. संधिवात, कफ, सांधे किंवा हाडे यांच्याशी संबंधित काही समस्या असल्यास चांदीची अंगठी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरू शकते.

४. आपल्या जन्मपत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो, त्यावरून आपली रास कळत असते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेतील चंद्रमा जर कमजोर असेल तर त्या व्यक्तीची मानसिक क्षमता कमी होते. त्यामुळे ही चांदीची अंगठी परिधान केल्याने ती चंद्रमाला मजबूत करून आपली मानसिक क्षमता वाढवण्यास मदत करते.

५. ज्या लोकांना अंगठी घालायला आवडत नाही, त्यांनी चांदीची चैन करून गळ्यात घालावी. हे शरीरात वात, कफ आणि पित्ताचा समतोल राखते. इतकेच नाही, ज्यांना बोलण्यात काही समस्या आहे किंवा जे थांबत थांबत बोलतात त्यांनी चांदीच्या अंगठी किंवा चांदीच्या चैनचा हा उपाय नक्कीच करावा.

चांदीची अंगठी किंवा चांदीची चैन परिधान करण्याव्यतिरिक्त चांदीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ खाल्ल्याने सर्दी-खोकला व सिंहास सारख्या त्रासापासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या दैनंदिन जीवनात आपण चांदीचा वापर करणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे.  धन्यवाद.