Headlines

आज महाशिवरात्रीमध्ये लागले आहे पंचक, चुकूनही करू नका हे काम अन्यथा होतील गंभीर परिणाम !

यावर्षी फाल्गुन मास कृष्णपक्षाच्या चतुदर्शीला महाशिवरात्रीचा सण आला आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. या वर्षी हा सण ११ मार्चला म्हणजेच आज आला आहे. भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी शंकराची पुजा करणे पवित्र मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी महाशिवरात्री पंचकामध्ये साजरा केला जात आहे. घनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपद, उत्तर भाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्राच्या संयोगाला पंचक असे म्हणतात. ज्योतिषास्त्रात पंचकाला शुभ मानले जात नाही.
चंद्राचे जेव्हा कुंभ आणि मान राशीत भ्रमण चालु असते तेव्हा पंचक निर्माण होतो.

या पंचकात काही गोष्टी करणे वर्ज करावे असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणजेच महाशिवरात्रीसारख्या पवित्र सणाला काही गोष्टी करणे प्रकर्षाने टाळावे. या पंचकाचा कालावधी गुरुवार ११ मार्चला सकाळी ९ वाजुन २१ मिनिटांनी सुरु होईल तर मंगळवारी १६ मार्चला सकाळी ४ वाजुन ४४ मिनिटांनी समाप्त होईल.

पंचक ६ प्रकारचे असते. रविवारी लागणाऱ्या पंचकाला रोग पंचक असे म्हणतात. सोमवारी सुरु होणाऱ्या पंचकाला राज पंचक म्हणतात. ते शुभ मानले जाते. मंगळवारी सुरु होणाऱ्या पंचकाला अग्नि पंचक म्हणतात या पंचकात नुकसान होण्याची शक्यता खुप असते. बुधवारी आणि गुरुवारी सुरु होणाऱ्या पंचकात मुहुर्त बघुन कार्य केले जाते. शुक्रवारी लागणाऱ्या पंचकाला चोर पंचक असे म्हणतात. या दिवशी वस्तुंची देवाणघेवाण करणे टाळावे. शनिवारी लागणारे पंचक हे सर्वात अशुभ मानले जाते त्यास मृत्यू पंचक असे म्हणतात.

शास्त्रानुसार पंचक काळात दक्षिणेकडे कोणतीही यात्रा करु नये. तसे केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पंचक काळात लाकाडाचे सामान खरेदी करु नये. त्यामुळे या दिवशी चुकुनही लाकडाचे फर्निचर यांसारख्या गोष्टी खरेदी करु नका.

पंचकाच्या दिवशी दुकान, घर , किंवा कार्यक्षेत्राठिकाणी छत घालु नये ते अशुभ मानले जाते. यामुळे घरात घडणाऱ्या शुभकार्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात परिवारातील कोणत्याही सदस्याचा मृत्यु झाल्यास परिवारातील इतर सदस्यांवर सुद्धा मृत्युचे वादळ घोंगावु शकते. किंवा एखाद्या व्यक्तीस मृत्युसमान यातना होऊ शकतात. या काळात खाट किंवा कोणतीही चारपाई, पलंग, बेड यासारख्या गोष्ट खरेदी करु नये. ते अशुभ मानले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.