Headlines

उतार वयामध्ये गुडगेदुखी, कंबरदुखीने त्रस्त आहात ? करा मग हे सहज सोपे घरगुती उपाय, पळून जाईल सांधेदुखी !

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण शारिरीक आणि मानसिक मेहनतीची अशी मल्टी टास्कींग कामे करण्यात व्यस्त असतात. दिवसभर अशी वेगवेगळी कामे करुन घरी गेल्यावर बरेचदा डोकेदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. अशावेळी आपण अनेकदा पे*न*कि*ल*र घेऊन तात्पुरती वेळ मारुन नेतो. पण नंतर दुसऱ्या दिवशी काम करुन घरी परतल्यावर या समस्य़ा पुन्हा नव्याने डोकं वर काढतात.

यात सर्वाधिक त्रास हा वयोवृद्ध लोकांना अधिक होतो. कधी कधी त्यांच्या सांध्ये वातीची समस्या इतकी वाढते की त्यांचे चालणे फिरणेपण मुश्किल होते. मग पुन्हा या दुखवण्यावर पे*न*कि*ल*र घेतले जाते. पण या पे*न*कि*ल*रचे सतत सेवन करणे आरोग्याला धोकादायक ठरु शकते. आता तुम्ही म्हणाल मग या दुखण्याला काय करायचं. आज आम्ही तुम्हाला या दुखवण्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या घरगुती उपायांना आयुर्वेदात देखील स्थान दिले आहे. तुम्हीसुद्धा हे उपाय करुन तुमची दुखणी घालवु शकता.

१) लवंग – लवंग आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. दात दुखीवर उपाय म्हणुन लवंग वापरली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की या व्यतिरिक्त सुद्धा लवंगचे काही उपयोग आहे. चहा मध्ये लवंग घालुन तो प्यायल्यास डोके दुखी, अंग दुखी, सर्दी यांसारखे आजार कमी होतात.

2) हळद – हळद ही स्वयंपाकघरात मसाल्यांचा पदार्थ म्हणुन वापरली जाते. याशिवाय जखम झाल्यास ती लवकर भरावी किंवा शरीरावर कुठे जखम झाल्यावर त्यातुन जर सतत र*क्त येत असेल तर ते थांबाव यासाठी हळद लावली जाते. हळद ही आरोग्यासाठी सुद्धा खुप लाभकारक असते. थंडीच्या दिवसात जर दूधात हळद घालुन प्यायल्यास अंग दुखी कमी होते. त्यामुळेच हळदीला वेदनानिवारक असे देखील म्हणतात. तसेच हळद जिथे सांधे दुखत आहेत तिथे रात्री झोपताना लावावे.

३) लिंबू – लिंबू हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतो. अंगदुखी, डोकेदुखी, शरीरातील मरगळ, जडत्व यांसारख्या समस्यांवर आराम मिळण्यासाठी ब्लॅक टी मध्ये लिंबाचा रस घालुन ती प्यायल्यास दुखण्यांपासुन आराम मिळतो. हे मिश्रण जिथे सांधे दुखत आहेत तिथे रात्री झोपताना लावावे.

४) मोहराचे तेल – हिवाळ्यात होणाऱ्या अंगदुखी किंवा सर्दी यांसारख्या त्रासांपासुन सुटका होण्यासाठी मोहरीच्या तेलात लसुण गरम करुन मालिश करावे. हे मिश्रण जिथे सांधे दुखत आहेत तिथे रात्री झोपताना लावावे. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यावर शरिरीतील दुखणे व गुडघे दुखी दूर पळते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. तुम्हाला जर सांधे दुखी किंवा इतर कोणत्याही दुखण्याचा जास्तच त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.