Headlines

जेवण बनवताना कोणते तेल लाभदायक आणि कोणते हानिकारक, जाणून घ्या !

जेवण बनवण्यासाठी तेलाचा वापर होतो. किंबहुना बहुतांश जेवण तेलाशिवाय तयार होत नाही असे म्हटल्यास हरकत नाही. मात्र तेल हे आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे तेलाचा बेताने वापर करावा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर काही विशिष्ट तेलांचा वापर जेवणात करावा. जेवण तयार करण्यासाठी कोणते तेल वापरावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ऑलिव्ह ऑइल – कुकिंग एक्सपर्ट जेवण तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करण्याचा सल्ला देतात. यामध्येही विशेषतः एक्स्ट्रा व्ह*र्जि*न ऑलिव्ह ऑईल मध्ये जेवण तयार केल्यास ते चांगले असते कारण हे तेल पूर्णपणे शुद्ध असते. कारण एक्स्ट्रा व्ह*र्जि*न ऑलिव्ह ऑइल ला प्रोसेस्ड आणि रिफाइंड केले जात नाही त्यामुळे या तेलाची कॉलिटी खूप चांगली असते.

या तेलात भरपूर प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि आणि काही प्रमाणात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते जे हृदयासाठी फायदेशीर असते. ऑलिव्ह ऑइल मध्ये मंद किंवा मध्यम आचेवर जेवण बनवावे. याशिवाय बेकिंग किंवा सलाड तयार करण्यासाठी ओलिव ऑइल हेल्दी मानले जाते.

नारळाचे तेल – नारळाच्या तेलाचा हायसॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे या तेला विषयी एक्सपर्टचे वेगवेगळे मत आहे. हायसॅच्युरेटेड फॅट आरोग्यासाठी हानिकारक असते त्यामुळे या तेलाचा वापर अधिक करू नये. हेल्दी पदार्थात या तेलाचा वापर केल्यास त्या पदार्थांमधील कोलेस्ट्रॉल कमी होते. परंतु आपल्या शरीराला काही प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट गरजेचे असते. त्यामुळे या तेलाचे सेवन कमी प्रमाणात करावे. नारळाच्या तेलाचे जेवण मोठ्या आचेवर करतात.

सनफ्लॉवर ऑइल – सनफ्लॉवर ऑइल मध्ये विटामिन इ मोठ्या प्रमाणात असतात. एक चमचा सनफ्लॉवर मध्ये २८% विटामिन ई चे प्रमाण असते. या तेलाला विशिष्ट अशी चव नसल्यामुळे यामध्ये तयार होणारे पदार्थांला सुद्धा तेलाची विशिष्ट चव येत नाही. या तेलाचा वापर हाय हीट कुकिंग मध्ये केला जातो. या तेलात ओमेगा ६ फॅटी ऍसिडचे प्रमाण अधिक असते. आपल्या शरीरासाठी ओमेगा ६ फॅटी ऍसिड महत्वाचे असते त्यामुळे या तेलाचा वापर करावा. मात्र ते ॲसिड जास्त झाल्यास शरीराला सूज येण्याची शक्यता असते.

व्हेजिटेबल ऑइल – व्हेजिटेबल ऑइल म्हणजे झाडांपासून तयार केलेले असते. हे तेल कुठल्या प्रकारच्या जेवणासाठी वापरले जात आहे यावर या तेलाचे गुण अवलंबून असतात. व्हेजिटेबल ऑइल हे प्रोसेस्ड आणि रिफाईंड केले जाते. त्यामुळे या तेलाची चव आणि पोषणतत्वे कमी प्रमाणात असतात. हे तेल शरीरात चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलचे संतुलन बनवून ठेवते. मात्र याचे अधिक सेवन करणे शरीरास अपायकारक ठरू शकते.

अवोकॅडो ओईल – अवोकॅडो ओईल भरपूर फायदेशीर असते. व्ह*र्जि*न ऑलिव्ह ऑइल प्रमाणे या तेलाला रिफाइंड केले जात नाही. मोठ्या आचेवर या तेलात जेवण बनवले जाते. या तेलाची चव खूपच कमी असते. अवोकॅडो प्रमाणे हे तेल सुद्धा क्रिमी असते. या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि विटामिन इ यांसारखे गुण असतात. या तेलाची किंमत इतर तेलांच्या तुलनेत जास्त असते.

शेंगदाण्याचे तेल – शेंगदाण्याच्या तेलाने जेवण बनवणे अधिक फायदेशीर असते. हे तेल चवीला सुद्धा उत्तम असते. या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असते. स्वादा सोबतच या तेलाचा सुगंध सुद्धा चांगला असतो.

करडईचे तेल – करडईचा तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट समप्रमाणात असतात. सर्व व्हेजिटेबल ऑइल मधील करडईच्या तेलात सॅच्युरेटेड फॅट सर्वात कमी प्रमाणात असतात. या तेलात तयार होणारे जेवण जास्त आचेवर केल्यास ते अधिक रुचकर होते तसेच त्याचा फायदा सुद्धा जास्त होतो. हे तेल प्रोसेड असल्यामुळे या तेलाला अधिक तर अनहेल्दी मानले जाते.

अक्रोडाचे तेल – अक्रोडाच्या तेलात स्मोकिंग कॉलिटी असते त्यामुळे या तेलात जेवण बनवले जात नाही. या तेलाचा वापर पॅन केक, ताजी कापलेली फळे आणि आइस्क्रीम वरून टाकण्यासाठी होतो. काही लोक हे तेल दूध किंवा कॉफीमध्ये घालून पितात. अक्रोडाचे तेलात ओमेगा ६ आणि ओमेगा ३ हे ऍसिड योग्य असतात यामुळे शरीराला कोणतेही इन्फलमेशन होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.