Headlines

रात्री झोपताना बेडवर चुकूनही ठेवू नका या वस्तू, भोगावे लागतील वाईट परिणाम !

आयुष्यात असा एखादा काळ येतो जेव्हा आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. या अडचणींचे कारण आपल्याला समजत नाही. काही वेळेस घरातील वास्तू शास्त्रानुसार काम न झाल्यास जीवनात अडचणी येतात. शिवाय दैनंदिन जीवनात आपण अशा काही चुका करतो याचा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यात पाहण्यास मिळतो.

काही लोकांना झोपतेवेळी काही वस्तू सोबत घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र ती सवय तुमच्या आयुष्यातील एक मोठी चूक ठरू शकते. या चुकीच्या तुमच्या आयुष्यात वाईट प्रभाव पडू शकतो.आज या पोस्ट मार्फत आम्ही तुम्हाला झोपतेवेळी कुठले सामान तुमच्या आसपास ठेवू नये याची माहिती देणार आहोत.

1. पर्स – कुबेर आणि देवी लक्ष्मीची कृपा असल्यास आपल्या घरात धनदौलत मुबलक प्रमाणात राहते. त्याची विधिवत रित्या पूजा करतात. रात्री झोपते वेळी पर्स किंवा बटवा डोक्या खाली घेऊन झोपू नका. यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते.
झोपतेवेळी पर्स किंवा वॉलेट डोक्याखाली घेऊन झोपलात तर तुमच्या पैशांची हानी होऊ शकते. पैशांचे योग्य स्थान तिजोरीत असते त्यामुळे ते कधीच डोक्याखाली ठेवून झोपू नये. तुमच्या पर्स किंवा वॉलेट्ची नेहमी काळजी घ्या आणि त्यांना सुरक्षित जागी ठेवावा.

2. दोरी – दोरी ही अशी गोष्ट आहे जी कधीही कुठेही उपयोगात येऊ शकते. काही लोक दोरीला झोपतेवेळी बाजूस घेऊन झोपतात. पलंगाजवळ दोरी किंवा साखळी ठेवू नये. असेल बोलले जाते की या वस्तू घरामध्ये वाईट प्रभाव आणतात आणि आपल्या बर्‍याच कामांमध्ये अडथळा निर्माण करतात.
शिवाय तुमच्या खोलीत कधीच रशी अडकवून ठेवू नका यामुळे तुमच्या घराची सजावट बिघडतेच शिवाय तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक अडचणी येतात.

3. इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस – झोपतेवेळी कधीही तुमच्या आसपास घड्याळ, मोबाईल, लॅपटॉप, व्हिडिओ गेम यांसारखे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ठेवू नका. असे म्हटले जाते की ही यंत्रे स्वचलित असतात आणि सतत त्यांचे काम करत असतात. त्या यंत्रणा जर तुम्ही झोपतेवेळी तुमच्या डोक्याजवळ ठेवलात तर तुमच्या जीवनातील शांती भंग होईल.

काही ज्योतिषांचे म्हणणे आहे की या यंत्रा मधून निघणारी किरणे आपल्या मनाला त्रास देतात. शिवाय ती शरीरास देखील हानिकारक असतात. लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर बिछान्यात न केल्यास अतिउत्तम ठरू शकेल. विशेष म्हणजे त्यांना कधीच डोक्याखाली घेऊन झोपू नका.

4. खलबत्ता – साधारणपणे स्वयंपाक घरातील वस्तू लोक झोपतेवेळी सोबत घेऊन झोपत नाहीत. मात्र जर तुम्ही गाफील राहून त्या वस्तू झोपतेवेळी बिछान्या जवळ ठेवलात तर तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. झोपते वेळी तुम्ही तुमच्या आसपास खलबत्ता घेऊन झोपलात तर तुमच्या नाते संबंधात तणाव वाढू शकतो.
काही लोकांना झोपतेवेळी पुस्तक वाचून झोपण्याची सवय असते त्यामुळे लोक झोपेत ते पुस्तक तसेच आजू बाजूला ठेवून झोपून जातात. झोपतेवेळी कधीही तुमच्या उशीखाली वर्तमानपत्र किंवा पुस्तक घेऊन झोपू नका अशाने तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.