Headlines

दिशा पाटणी सोबत फोटोग्राफर्सनी असे काही केले कि दिशा पोज द्यायला पण लाजली !

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेले काही दिवस दिशा चित्रपटांपासून दूर होती. आता या चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी चित्रपटात दिसणार आहे. दिशा पटानी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नसल्याचे दिसून येते.

पण यादरम्यान, पापाराझींसमोर (पापाराझीं म्हणजे ते फोटोग्राफर जे अभिनेते अभिनेत्री अथवा मोठ्या व्यक्तींचे फोटो काढतात ) पोज देत असताना दिशा पटानीसोबत असे काही घडले आहे, ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्सने फोटोग्राफर्सनाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दिशा सध्या तिच्या ‘एक व्हिलन रिटर्न’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती त्या निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांना इव्हेंटना उपस्थिती लावत असते. अशाच एका इव्हेंटमधून ती बाहेर येत असताना तिला फोटोग्राफर्सनी घेरले व तिच्याकडे फोटोसाठी मागणी केली.

सगळेजण तिला दिशा दिशा म्हणून हाक मारत होते पण त्यातले काहीजण तिला दिशू म्हणून सुद्धा हाक मारत असल्याचे ऐकू येत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच, सर्व वापरकर्त्यांनी पापाराझींना त्यांच्या कृतीबद्दल ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


दिशा तिच्या ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खूपच बो’ल्ड आउटफिटमध्ये दिसली होती. तिने टाईट फिटिंग मेहरून गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तिथे उपस्थित असलेल्या कोणाचीच नजर दिशावरून हटत नव्हती.

ती खूप सुंदर दिसत होती. दिशा एक फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे, दररोज वर्कआउट करण्यासोबत ती मार्शल ट्रेनिंग देखील घेते. त्याचबरोबर ती बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला अनेक वर्षांपासून डेट करत आहे.


दिशाच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती मागील वर्षी सलमान खानच्या राधे या चित्रपटात दिसली होती. पण त्या चित्रपटात तिला फारसे यश मिळाले नाही.यावर्षी ती एक व्हिलन रिटर्न या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात दिशा सोबत जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, ट्रेलरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !