Headlines

रातोरात नॅशनल क्रश बनलेली ‘मिर्झापूर २’ मधील माधुरी यादव आहे तरी कोण जाणून घ्या !

चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा प्रेक्षक घरच्या घरी त्यांच्या सवडीने डिजिटल माध्यमातून पाहणे पसंत करतात. सध्या डिजिटल माध्यमांवर देखील उत्तम आशय असलेल्या दर्जेदार वेब सिरीज येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकां सोबतच मोठमोठ्या कलाकारांचा कल सुद्धा डिजिटल माध्यमांकडे वळलेला दिसतो. सॅक्रेड गेम नंतर मिर्झापूर या वेब सिरीज ची चर्चा होती. या वेब सिरीज चा दुसरा पार्ट नुकताच रिलीज झाला.

मिर्झापूर या वेब सिरीज मध्ये मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री इशा तलवारीने मुन्ना भय्या च्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये ईशाच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरीही या वेब सिरीज चे कौतुक फारसे होत नाही. ईशाने या आधी सलमान खान सोबत ट्यूबलाइट या चित्रपटामध्ये तर अभिनेता सैफ अली खान सोबत या चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र तिचे हे दोन्ही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
इशा तलवार आता ३२ वर्षांची असून २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर यांचा चित्रपट हमारा दिल आपके पास है या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने तिचा मोर्चा दक्षिणे कडे वळवला. तेथे तिने तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

ईशाने मल्याळम चित्रपट ‘थट्टाथिन मरायथु’ मधून डेब्यू केला. या चित्रपटात तिने एका मुस्लिम मुलीची भूमिका साकारली होती जी एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. याचा इशाला देखील भरपूर फायदा झाला. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर कमर्शियल जाहिराती बनवणाऱ्या निर्मात्यांचे इशावर लक्ष गेले. त्यानंतर तिने पिझ्झा हट, फेअरनेस क्रीम, स्किन क्लीनिक आणि पेंन्ट बनवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातींमध्ये ती दिसली. ईशा मध्यंतरी म्युझिक व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसली होती मात्र या व्हिडीओ मध्ये संपूर्ण फोकस ऋतिक रोशन वर गेला त्यामुळे ईशाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले.

ईशाने तिचे करिअर बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. मल्याळम चित्रपटांमध्ये तिचा भरपूर बोलबाला आहे. तिने तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपटासाठी ट्रेनिंग सुद्धा घेतली होती असे म्हटले जाते. चार-पाच वर्षे मल्याळम चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ईशाने तेलगू आणि त्यामुळे चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.

तेलुगू मध्ये ‘गुंडे जारी गल्लनथय्यिंदे’ आणि तमिळ मध्ये ‘थिल्लू मुल्लू’ हे चित्रपट हिट ठरले मात्र मल्याळम चित्रपटांसारखे यश तिला मिळाले नाही. हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न ती सतत करत असते मात्र कास्टिंग डायरेक्टर नेहमी तिला सेकंड किंवा थर्ड लीड रोल देतात. अशातच सलमान खान सोबतचा ट्यूबलाइट आणि सैफ अली खान सोबतचा कालाकांडी हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर तिच्या करिअरमध्ये अजूनच अडचणी येऊ लागल्या.

आता एक्सेल एंटरटेनमेंट च्या मिर्झापूर २ या वेबसिरीजमध्ये ईशा दिसली. या सिरीज कडून तिला भरपूर अपेक्षा होत्या मात्र सिरीज निर्मात्यांनी किंवा सिरीज प्रमोशन करणाऱ्यांनी तिचे नाव कलाकारांच्या यादीत सहभागी केले नाही. पहिल्या सिझनचे भरपूर कौतुक करणारे प्रेक्षक मात्र या सीजन असे फारसे कौतुक करताना दिसत नाहीत. याशिवाय सोशल मीडियावर लोक ही सीरिज मध्येच सोडण्याच्या कमेंट करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !