फणस हे या रोग्यांसाठी आहे अमृतासमान, फणसाचे हे फायदे पाहून थक्क व्हाल !

bollyreport
3 Min Read

सीजनल फ्रुट्स चा आहारात समावेश करावा असा सल्ला डॉक्टर आपल्याला नेहमी देत असतात. प्रत्येक फळांमध्ये त्यांचे विशिष्ट गुणधर्म असतात जे आपल्याला रोगांपासून लढण्यास मदत करतात. उन्हाळ्यात आंबा, फणस, करवंद यांसारखे सीजनल फ्रूटस उपलब्ध असतात. त्यावेळी आपला अधिक तर कल हा आंबे खरेदी करण्याकडे जास्त मात्र आंबा या फळासोबतच फणस देखील तितकाच महत्त्वाचा आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बदलत्या हवामानानुसार लोकांची जीवनशैली बदलत जाते. त्यामुळे लोकांमध्ये आळशीपणा तसेच बेफिक्री वाढलेली दिसते. लोकांच्या अशा आळशीपणामुळे ते स्वतः आजारपणाला निमंत्रण देतात. यामध्ये प्रामुख्याने वजन वाढणे, डायबीटीस आणि केस गळती यांसारखे आजार उद्भवतात. डायबिटीस सारख्या आजारांमध्ये औषधांत सोबतच स्वतःची देखभाल करणे देखील महत्त्वाचे असते.

डायबिटीस हा आजार कुठल्याही वयात होऊ शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आजारापासून दूर राहण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींवर लक्ष द्यावे. तसेच गोड पदार्थांचे सेवन कमी करावे. जर तुम्ही सुद्धा डायबिटीस ने ग्रस्त असाल आणि तुम्हाला तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित करायची असल्यास तुमच्या डायटमध्ये फणसाचा समावेश अवश्‍य करावा.

फणस हे फळ डायबिटीस रुग्णांसाठी अमृतासमान असते. डायबिटीस असलेल्या रुग्णांनी फणस खाल्ल्यास त्यांना लवकर आराम मिळतो. फणसाला इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट असे म्हणतात. फणस भारतासोबत बांगलादेश आणि श्रीलंका या देशातसुद्धा आढळतो. भारतातील अनेक राज्यांमध्ये फणसाची शेती केली जाते.

फणसांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यांचा उपयोग रोगांशी लढण्यास होतो. डायबेटिस रुग्णांनी फणसाचे सेवन केल्यास त्यांचा आजार कमी होऊ शकतो असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका माहितीनुसार फणसाच्या पिठाचे सेवन केल्यास शरीरातील HbA1c ‘ग्लाइ’कोसि’लेटेड हीमो’ग्लोबि’न’, FBG-फास्टिंग ब्लड ग्लूकोज आणि PPG-पो’स्टप्रें’डि’यल ग्लूकोजची पातळी कमी होते.

यावर संशोधन करताना टाईप २ डायबिटीज असलेल्या ४० रुग्णांवर संशोधन केले गेले. या रुग्णांना दररोज ३० ग्राम फणसाचे पीठ खाण्यास दिले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत असे दिसून आले की ज्या लोकांनी गव्हाच्या किंवा इडलीच्या पिठात फणसाचे पीठ मिळवून त्याचे सेवन केल्यास शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.

अशाप्रकारे तयार करा फणसाचे पीठ – यासाठी फणसाच्या बिया चांगल्या सुकवून घ्या. सुकल्यानंतर त्याच्या साली काढून घ्या. आता त्या बिया चांगल्या कुटून घ्या. तयार झालेले मिश्रण रोज ३० ग्रॅम साध्या पिठात मिक्स करून त्याचे सेवन करा

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.