Headlines

चालत्या रेल्वे मधून काही सामान बाहेर पडल्यास लिहून घ्या हा नंबर, काय आहे त्याचा अर्थ समजून घ्या !

रेल्वेने प्रवास करताना प्रवासी आपल्या सामानाची फार देखभाल करतात. आपलं सामान सुरक्षित राहावं, याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. कधी कधी काळजी घेऊन देखील सामान हरवतं किंवा अदला बदली होतं किंवा मग ते रेल्वेमधून खाली पडतं. ते सामान म्हणजे एखादी महत्त्वाची बॅग असू शकते किंवा इतर काही वस्तू ज्यामध्ये तुमचं अतिआवश्यक सामान किंवा काही कागदपत्र वगैरे असू शकतात. मग अशा वेळी चालत्या रेल्वेतून आपलं सामान पडल्यास काही सामान पडल्यास काय करता येईल? चैन खेचून रेल्वे थांबवू शकतो की इतर काही पर्याय आहे? चला तर मग पाहूया !

भारतीय रेल्वेमधील गेटमैन श्री शक्ति श्याम श्रीवास्तव यांनी खालील माहिती दिली आहे. इलाहाबाद यूनिवर्सिटीमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे प्रवास करताना आपण सावध असलं पाहिजे, आपली काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपलं सामान कधीही चालत्या रेल्वेतून पडणार नाही. पण जर का असं काही घडलं तर आपलं सामान आपण परत मिळवू शकतो.
आपलं सामान जर चालत्या रेल्वेतून बाहेर पडलं तर रेल्वे रुळाच्या जवळ असलेल्या विजेच्या खांब्यावर लक्ष द्यावे. त्या खांब्यावर किलोमीटर संख्या दिलेली असते. ती लगेच लिहून घ्यावी. 795/20 ही संख्या अशा स्वरूपात दिलेली असते. याचा अर्थ असतो 795 किलोमीटर संख्येचा 20 वा खांबा. ह्या खांब्याचा रंग मुख्यत्वे पांढरा असतो आणि आकाराला देखील छोटा असतो.

रेल्वेतून आपलं सामान पडताच जर त्या विभागातील खांब्याचा क्रमांक तुम्ही लिहून ठेवला असेल तर तशी सूचना आरपीएफ हेल्पलाइन क्रमांक १८२ या क्रमांकावर द्यावी. अथवा जीआरपी हेल्पलाइन क्रमांक १५१२ या क्रमांकावर ती सूचना देऊ शकता. तुमच्या सूचनेनंतर त्या विभागातील पोलीस चौकी अथवा स्टेशनवर जाऊन तुम्ही तुमचं सामान परत मिळवू शकता.

पण सोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्र वगैरे दाखवून निश्चित करून घ्यावं लागेल. त्यामुळे सोबत ओळखपत्र ठेवावे. याशिवाय तुम्ही पुढील स्टेशनवर उतरून जीआरपी किंवा स्टेशन मास्टरला देखील तुमच्या सामनाबद्दल माहिती देऊ शकता. तुम्हाला किलोमीटर संख्या, तुमचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता देणे आवश्यक असते. जर तुमचं सामान त्यांना मिळालं तर ते तुमच्याशी संपर्क साधू शकतात.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही सामान रेल्वेमधून पडलं असेल त्यासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार नसेल. ते फक्त आपलं सामान आपल्याला परत मिळवण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे आपल्या किमती वस्तू व सामानांची आपण स्वतःच काळजी घेणं योग्य ठरेलं.

आपलं पडलेलं सामान आपल्याला परत मिळेल याची खात्री देता येतं नाही. आपलं काही किमती सामान असेल आणि आपलं सामान ज्या ठिकाणी पडलं असेल तिथे एखादी दुसरी व्यक्ती असेल तर आपलं सामान नक्कीच चोरू शकतं. त्यामुळे रेल्वे प्रवासात आपल्या वस्तुंची योग्य ती काळजी आपण स्वतः घ्यावी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !