Headlines

अभिनेता शाहरुख खानला त्याच्या चाहत्याने विचारले ‘मन्नत बंगला’ विकणार का त्यावर त्याने दिले हे उत्तर !

बॉलिवूडचे कलाकार चित्रपट आणि जाहिराती मार्फत बक्कळ पैसा कमवून स्वतःची प्रॉपर्टी तयार करतात. आपल्याला बॉलिवुडमध्ये असे अनेक कलाकार पहायला मिळतील ज्यांच्याकडे करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये मोठमोठे बंगले, महागड्या गाड्या, जमिनीचे प्लॉट यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. कलाकारांप्रमाणेच त्यांची घरेदेखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. काही वेळेस सेलिब्रिटी पाहण्यास मिळाले नाहीत तर लोक त्यांच्या घराबाहेर जाऊन त्यांच्या घरासोबत फोटो काढतात.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुंबईतील बँड स्टँड येथे अलिशान बंगला आहे. या बंगल्याचे नाव मन्नत असे असून येथे बंगल्याबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांचा गराडा नेहमीच पाहायला मिळतो. शाहरुख खान जेव्हा सुपरस्टार नव्हता तेव्हापासून त्याची इच्छा होती की त्याचाही मन्नत प्रमाणे बंगला असावा.

शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की लग्नानंतर तो गौरीला मोठ्या घरात आणू शकला नव्हता मात्र नंतर त्याने तिची ती इच्छा पूर्ण केली. शाहरुखने सांगितले कि त्याचा मन्नत हा बंगला नुसते घर नसून ती एक भावना आहे. नुकतेच या मन्नत घरा संबंधित एका ट्रॉलर ने शाहरुख खान ला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे सर्वजण चकित झाले.
मंगळवारी शाहरुख खान ने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांसाठी ट्विटर वर एक खास सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये तो चाहात्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होता. दरम्यान एका ट्रोलरने शाहरुख ला विचारले की, तू मन्नत विकणार आहेस का?

शाहरुख अशा प्रश्नांना नेहमीच अशी काही उत्तरे देतो ज्यामुळे समोरच्याची बोलती बंद होऊन जाते. यावेळी देखील शाहरुखने त्याच्या अंदाजात उत्तर दिले त्यामुळे समोरचा निरुत्तर झाला. शाहरुखने म्हटले की भाई मन्नत विकली जात नाही तर डोके टेकवून मागितली जाते. ही गोष्ट लक्षात ठेवशील तर आयुष्यात नक्की काहीतरी मिळवशील. शाहरुखने त्या ट्रॉलरला रिप्लाय देता‌ देता त्याला धडा शिकवला. सध्या शाहरूख हे उत्तर खूप व्हायरल होत आहे.

लवकरच शाहरुख त्याच्या पुढील चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार असून तो सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह राहू लागला आहे. शाहरुख काही खास पोस्ट करायचे असल्यास सोशल मीडियाचा वापर करतो. काही वेळेस तो त्याच्या फॅन्स सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी देखील असे सेशन घेत असतो.

शाहरुख खान नोव्हेंबर महिन्यात त्याचा पुढील चित्रपट पठान ची शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता जॉन अब्राहम दिसणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !