Headlines

हार्ट अटॅक पासून वाचण्याकरीता आपल्या आहारात करा या गोष्टींचा समावेश, हार्ट अटॅक पासून सदैव राहाल दूर !

अनेक लोकांचा असा समज असतो की, फक्त व्यायाम केल्याने हृदयाला स्वस्थ राखले जाते , याकरिता अनेक जण आपल्या आहारावर अजिबात लक्ष देत नाही. तज्ञ मंडळीचे ऐकलेे तर हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावत असतो, यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर विशेष ज्ञान देणे गरजेचे आहे. अनेकांना हार्ट अटॅक पूर्वी छाती आणि डाव्या हातामध्ये दुखू लागते.

खरंतर असे सर्वांसोबत घडत नाही म्हणूनच हार्ट अटॅक पासून जर स्वतःचे संरक्षण करायचे असल्यास आपल्या आहारामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टीचा समावेश करणे आवश्यक आहे. जर तुम्हीसुद्धा तुमच्या आहाराकडे दुर्लक्ष करत असाल तर ही धोक्याची घंटा सिद्ध होऊ शकते, म्हणूनच तुमच्या आहारामध्ये या तीन गोष्टींचा नेहमी समावेश करा.

अंड्याचेव सेवन नियमितपणे करा – अंड्याला प्रोटीनचे पावर हाउस समजले जाते. हृदयासाठी अंडे पावर हाउस समजले जाते. हृदयासाठी अंडे खूपच लाभदायक असते, नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार नियमितपणे अंडे खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो म्हणून दररोज एक अंडे खा.

बेरी चा वापर करा – बेरी हेचसामान्यतः चव सुधारण्यासाठी वापरली जातात. खरंतर, बेरी हृदयासाठी अत्यंत लाभदायक आहेत. नुकत्याच केल्या गेलेल्या  एका संशोधनात असे दिसून सिद्ध झाले आहे की, दररोज एक कप बेरीचे सेवन केल्यास रक्तदाब सुधारतो. यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँथोसायनिन हे गुणधर्म असतात जे हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करतात म्हणून हार्ट अटॅकचा धोका निर्माण होत नाही.

पालक अवश्य खा – जेव्हा गोष्ट हृदयाला नीट व स्वस्थ ठेवण्याची येते, तेव्हा पालक हा सर्वोत्तम आहार मानला जातो. पालकमुळे शरीरातील फक्त लोहाची कमतरता दूर होत नाही तर डोळ्यांची नजर सुद्धा तीव्र राहते. त्याचबरोबर हृदयासाठी पालक खूप लाभदायक मानले जाते तसेच पालकमध्ये जीवनसत्व अधिक प्रमाणात उपलब्ध असतात, सोबतच नायट्रेट सुद्धा उपलब्ध असते. दोघेही पोषक तत्व हृदयासाठी संरक्षानात्मक कवच म्हणून कार्य करत असतात. नियमितपणे आहारामध्ये पालकांचा समावेश केल्यास तुमच्या रक्तदाबाची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते.

पपई – पपई मध्ये जीवनसत्व क उपलब्ध असते तसेच एंटीऑक्सीडेंट आणि फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्ताच्या गाठी बनण्यापासून थांबवते अनेकदा कोलेस्ट्रॉल मुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते नियमितपणे पपई खाल्ल्याने तुम्हाला लवकरच फायदा होईल.

टरबूज – एक कप टरबूज तुमचा संध्याकाळचा नाश्ता खूप महत्वपूर्ण बनवू शकतो.
अननस – हे एक अतिशय गोड, आंबट गोड चव असलेले फळ आहे, जे तुम्ही एकतर फळांसारखे खाऊ शकता किंवा रस म्हणून पिऊ शकता.

सफरचंद – सफरचंद हे डॉक्टरांपासून दूर ठेवते असे म्हंटले जाते. आपणास सफरचंदाचा रस आवडत असल्यास, तो इतर कोणत्याही रसऐवजी पिऊ शकतो. सफरचंद खाल्ल्याने रक्ताची कमतरता भासत नाही तसेच रक्ताभिसरण नीट होते. अश्या आहारासोबत दररोज चालण्याचा नियमित व्यायाम करा तुमचे हृदय निरोगी राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप –  लेखातील माहिती हि आपल्या सामान्य माहितीसाठी आहे. आपल्याला काही आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.