Headlines

काजोलला विचारले जर तिची मुलगी न्यासा, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत पळून गेली तर काय करशील, उत्तर ऐकून व्हाल थक्क !

चित्रपट क्षेत्रात असे अनेक जोडपे आहेत, जे आपल्यालानेहमी लक्षात राहत असतात. त्यांच्यातील केमिस्ट्री आपल्याला नेहमी हवी हवीशी वाटत असते. हे जोडपे पडद्यावर दिसले कि, चाहते आनंदाने नाचू लागतात. असेच सर्वांचे लाडके जोडपं शाहरुख आणि काजोल. दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडली आहे.

हे जोडपे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. आज सुद्धा असेच एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे हे दोघें पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहे .चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. काजोल नेहमी आपल्या विवादास्पद वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहते.

सध्या काजोलचा एक वीडियो सोशल मीडियावर वायरल होत आहे, ज्यात काजोल, शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि आपली मुलगी न्यासाबद्दल असे काही बोलून जाते कि, किंग खानसुद्धा आश्चर्यचकित होऊन जातो. हा वीडियो करण जोहरचा शो कॉफी विद करण मधील आहे, ज्यात काजोल, शाहरुख आणि राणी मुखर्जी दिसत आहे.

वीडियोमध्ये तुम्ही पाहाल कि, करण, काजोलला विचारतो कि आजपासून १०वर्षा नंतर जर आर्यन आणि न्यासा पळून जातात तर तुझी काय प्रतिक्रिया राहील? काजोल म्हणते कि , “दिलवाले दूल्हा ले जाएंगे”. काजोल च्या या विधानामुळे शाहरुख थोडासा गोंधळून जातो मग तो म्हणतो कि मला विनोद कळला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by HashiyehLand (@hashiyehland)

मला या गोष्टीबद्दल भीती वाटते कि जर काजोल माझी नातेवाईल झाली तर…मी विचारसुद्धा करू शकणार नाही. शाहरुखचे हे म्हणणे ऐकल्यावर काजोल आणि राणी दोघेही हसू लागतात. डॉटर्स डे वर काजोलने न्यासासाठी लिहली होती विशेष पोस्ट काजोलने लिहले होते कि, माझी प्रिये, मला तुझ्यात सर्वात जास्त आवडणारा कोणता घटक असेल तर तो आहे तुझा दृष्टिकोन. हा नेहमी मला माझ्यापेक्षा वेगळा वाटतो. तो मला आणि सर्वांना अगदी स्पष्टपणे दिसतो तसेच असे करणे माझ्यासाठी कठीण आहे!!

काजोलने यासोबत हे सुद्धा सांगितले कि, तिच्या या फोटोना न्यासाने क्लिक केले होते. आपणास सांगू इच्छितो कि,न्यासा आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी सिंगापुर येथे गेली आहे. न्यासासोबत तिची आई काजोल आहे, तसेच अजय देवगन मुलगा युग सोबत मुंबई मध्ये राहत आहे.

काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर ती शेवटची आपल्याला चित्रपट तान्हाजीमध्ये दिसली होती, ज्यात अजय देवगन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होते. सध्या तरी काजोलने आगामी प्रोजेक्ट्सबद्दल काही सांगितले नाहीये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !