Headlines

वापर करा या हिरव्या पानांचा, तुमचे पांढरे केस होतील मुळापासून काळेभोर आणि मजबूत !

केस गळती किंवा केस पांढरे होणे यामुळे अनेकजण बेजार असतात. स्त्रियांना तर केस गळतीचे भरपूर टेन्शन येते. कारण केस स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारा विशेष भाग असल्याचे म्हटले जाते. वेगवेगळ्या केशरचना करून स्त्रिया स्वतःचे सौंदर्य फुलवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र केस गळती सुरू झाली की केस पातळ होतात तर काही वेळेस टक्कल पडू लागते.

शिवाय केस पांढरे झाले तर कमी वयात म्हातारपण आल्यासारखे वाटते. त्यामुळे केस गळू नये व काळेभोर रहावेत यासाठी वेगवेगळ्या महागड्या औषधांचा वापर केला जातो. मात्र त्यात असलेल्या केमिकल मुळे केस अजून खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही तीन दिवस केलात तर तुमचे केस मुळापासून काळे होतील.

कढीपत्त्याच्या पानांमुळे केसांची वाढ जलद – कढीपत्त्याच्या पानाचा उपयोग साधारण सर्वच घरात जेवणासाठी केला जातो. मात्र या कढीपत्त्याच्या पानांचा वापर केसांसाठी सुद्धा केला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल तर ते कसे आम्ही तुम्हाला सांगतो. कढीपत्त्याची पानं केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर त्याचा उपयोग केसांसाठी सुद्धा केला जातो.

कढीपत्त्याच्या पानांमुळे केसांची वाढ जलद गतीने होते. सोबतच केस हेल्दी व काळे बनतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये लोह, फॉलिक ऍ सि ड, फॉ स्फ र स ,विटामिन सी ,बी ,ए आणि ई यांसारखे गुणधर्म असतात. याचा परिणाम केसाच्या मुळाशी होऊन केस सुदृढ होतात. याचा वापर केल्यानंतर केसातील वाढ, केसांना आलेली चमक स्पष्ट दिसून येते.

केसांसाठी कढीपत्त्याची पाने नारळाच्या तेलात घालून पाच ते सात मिनिटे गरम करा. पानांमधील पोषक तत्व तेलामध्ये मिसळेल. या तेलाला बोटांनी केसांच्या मुळाशी लावून हळूहळू मसाज करा. जोपर्यंत केसांमध्ये नीट शोषले जात नाही तोपर्यंत नीट मसाज करा. तेल लावल्यानंतर साधारण एका तासाने नॉर्मल शाम्पूने केस धुवा.

दुसरा उपाय म्हणजे कढीपत्त्याची पाने उन्हात सुकवून ती बारीक वाटा. तयार झालेल्या पुड मध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा.
कढीपत्त्याच्या पेस्टला ऑलिव ऑइल सोबत वापरा.

या मिश्रणाला केसांच्या मुळाशी लावल्यावर एका तासाने केस धुवा. असे केल्यास तुमच्या केसांना कढीपत्त्याच्या पानांमधील पोषक तत्त्वं सोबतच ऑलिव ऑइल मधील पोषक तत्वे देखील मिळतील जेणेकरून तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !