Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या दोन फोटो मधील फरक ओळखू शकतो, फोटो झूम करा उत्तर सापडेल !

आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण आयुष्याकडे सकारात्मक पाहतात तर काहीजण नकारात्मक. एखादी गोष्ट ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला भावते. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती तुम्हाला कधीच आवडणार नाही याउलट जर तीच गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली तर ती तुम्हाला लगेच आवडू लागेल.

सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोनाप्रमाणेच माणसाची निरीक्षण शक्ती सुद्धा महत्त्वाचे असते. एखाद्या गोष्टीकडे डोळसपणे पाहिले तर त्या गोष्टी तील फरक आपल्याला जाणवतो. या डोळसपणा साठी मनाची एकाग्रता असणे महत्त्वाचे असते. यासाठी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. मनाची एकाग्रता वाढल्यास निरीक्षण क्षमता वाढून बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. यामुळे आयुष्यात आलेले कठीण प्रसंग तुम्ही सहज रित्या सोडवू शकता.
सध्या सोशल मीडिया चे युग आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक चॅलेंजेस एकमेकांना देण्याचा ट्रेंड आहे. एखादा फोटो पाठवून त्यातील फरक शोधणे किंवा त्यात लपलेली एखादी गोष्ट शोधून दाखवणे या सर्व गोष्टी हल्ली विरंगुळा घालवण्याचे साधन बनले आहे.

आज आम्ही तुम्हाला असेच एक कोडे देणार आहोत. या कोड्याचे उत्तर तुम्हाला एका मिनिटाच्या आत द्यायचे आहे. या कोड्यात आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देऊ.हे फोटो जरी समान दिसत असले तरी त्यांच्यामध्ये पाच फरक आहेत. हे फरक तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीद्वारे ओळखून आम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे.
या फोटोमध्ये आम्ही तुम्हांला अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी २ या चित्रपटातील एका सीनचा फोटो दिला आहे. या दोन फोटोमध्ये पाच वेगळे फरक आहेत ते तुम्हाला एका मिनिटात शोधून आम्हाला कमेंट द्वारे कळवायचे आहे. दमलात! खूप प्रयत्न करून देखील जर तुम्हाला या फोटोतील पाच फरक मिळत नसतील तर आम्ही तुम्हाला ते शोधण्यास मदत करतो.

1. या कोड्यातील पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोत अक्षय कुमारच्या स्कुटीची हेडलाईट गोलाकार आहे तर दुसर्‍या फोटोत ती चौकोनी दाखवली आहे. 2. या कोड्यातील दुसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अक्षय कुमारच्या स्कुटीला टायरच्या वर काळ्या रंगाचा स्टिकर लावला आहे तर दुसर्‍या फोटोत तो स्टिकर दिसत नाही.

3. या कोड्यातील तिसरा फरक म्हणजे दुस-या फोटोत अक्षय कुमार च्या पाठी काळा कोट घातलेल्या बाईच्या मागे एक माणूस आहे मात्र पहिल्या फोटोत तो माणूस दिसत नाही. 4. या कोड्यातील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अक्षय कुमार च्या शेजारी असलेल्या गॉगल घातलेला माणसाच्या पाठी एकच पिवळ्या रंगाचा खांब दिसतो. तर दुसर्‍या फोटोत त्या माणसाच्या पाठी दोन पिवळे खांब दिसत आहे.
5. या कोड्यातील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अक्षय कुमारच्या स्कुटीला एक आरसा दिसत आहे तर दुसर्‍या फोटोत दोन्ही आरसे गायब झाले आहेत.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.