Headlines

एका फोटोमुळे सध्या ‘टायगर श्रॉफ’ची बहिण ‘कृष्णा श्रॉफ’ आली आहे चर्चेत !

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण आणि अभिनेता जॅकी श्रॉफ ची मुलगी कृष्णा नेहमी तिच्या बॉयफ्रेंड मुळे चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ सध्या बास्केटबॉल प्लेयर एबन ह्यमस डेट करीत आहे. हे दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. कृष्णा शॉप नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती खूपदा एबन ह्यमस सोबतचे फोटो टाकत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत येत असते.
आता पुन्हा एकदा कृष्णा सोशल मीडिया वरील पोस्ट चर्चेत आली आहे. तिने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम प्रोफाईलवर बॉयफ्रेंड एबन ह्यमस सोबत लीपलॉक करताना फोटो टाकला आहे. कृष्णा श्रॉफ आणि एबन ह्यमसचा हा फोटो एक्वेरियम म्युझियम मध्ये काढला गेलेला आहे. फोटोमध्ये हे दोघे म्युझियम मध्ये लीपलॉक करताना दिसतात. या फोटो मागे खूप सारे मासे सुद्धा दिसत आहेत. कृष्णा श्रॉफ पोस्ट अनुसार हा फोटो दुबईमधील एका म्युझियम चा आहे.
हा फोटो पोस्ट करताना कृष्णा श्रॉफ ने तिच्या बॉयफ्रेंड साठी एक खास कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. तिने ह्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,समुद्रातील माझा सर्वात आवडता मासा ! अनेक सोशल मीडिया युजर्सनी कृष्णा श्रॉफ च्या ह्या इंस्टाग्राम वरील पोस्ट ला प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या कृष्णा श्रॉफ तिच्या बॉयफ्रेंड सोबत म्हणजेच एबन ह्यमस सोबत दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कृष्णा फिल्म इंडस्ट्री पासून खूप दूर राहणे पसंत करते तरीही ती चर्चेत मात्र असते.
काही दिवसांपूर्वी ती एबन ह्यमस सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसली होती. सोशल मीडियावर देखील तिने तिच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन चे फोटो टाकले होते. या फोटोमध्ये कृष्णा तिच्या बॉयफ्रेंड सोबत क्वालिटी टाइम चालवताना दिसते. या फोटोसोबत कृष्णाने कॅप्शन लिहिले होते की, मी रोज तुझी आभारी असेन. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल सुद्धा झाले होते. कृष्णा श्रॉफ आणि एबन ह्यमसची मुलाखत एका रेस्टॉरंट मध्ये झाली होती. नंतरच हे दोघे एकमेकांसोबत राहायला लागले.
कृष्णाची एबन ह्यमस सोबत फोटो टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही अनेकदा त्याच्या सोबत फोटो टाकले आहेत. एबन ह्यमस हा टायगर श्रॉफ चा खूप चांगला मित्र आहे. कृष्णा जेव्हा एबन ह्यमस सोबत फोटो टाकत असते त्यावेळी टायगर त्या फोटोवर कॉमेंट करत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *