Headlines

धोनीला ‘थाला’ असे का संबोधले जाते? काय आहे या शब्दाचा अर्थ ?

भारतीय क्रिकेट संघाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानावर चौकार-षटकार मारताना दिसेल. लवकरच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरु होत आहे. टीम चेन्नई सुपर किंग्स चा कॅप्टन असलेल्या धोनीने यासाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. चेन्नईमधील एम चिन्नास्वामी येथे धोनी प्रॅक्टिस साठी गेला आहे. ध्वनि तेथे फक्त प्रॅक्टिस करण्यासाठी गेला तरीही त्याला बघण्यासाठी तेथे हजारो दर्शकांची गर्दी झाली होती. धोनीला त्याचा चाहतावर्ग थाला म्हणून हाक मारतो. परंतु थाला या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
महेंद्रसिंग धोनीला त्याचे चाहते थाला म्हणून ओळखतात हे आपल्याला ठाऊक आहे. यामध्ये दक्षिण भारतीय वर्गाचा मोठा समावेश आहे. थाला हा शब्द थालाइवर या शब्दापासून बनला आहे. तमिळमध्ये थालाइवर या शब्दाचा अर्थ नेता असा होतो. या व्यतिरिक्त सुद्धा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत जसे की कोणत्याही एका दलाचा नेतृत्व करणारा, कठीण परिस्थितीमध्ये लढून यश प्राप्त करणारा व्यक्ती, आणि एखादा असा व्यक्ती जो त्याच्या साधेपणा साठी ओळखला जातो इत्यादी.
धोनी आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नेतृत्व करतो हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. धोनी मुळे ही टीम आयपीएल मधील यशस्वी टीम बनली आहे. शिवाय धोनी त्याच्या साधेपणा साठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याला थाला असे म्हटले जाते. चेन्नई सुपर किंग या संघाचा कॅप्टन पद धोनी अनेक वर्षा सांभाळत आहे आणि धोनीने तीन वेळा चेन्नई सुपर किंग या संघाला विजेतेपद सुद्धा मिळवून दिले आहे त्यामुळे अनेक तमिळ भाषिक लोक धोनी चे चाहते आहेत.
तमिळ मध्ये थाला या शब्दाचा अर्थ आहे मुख्य किंवा संचालन करणारा.
भारतातील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन पैकी एक मानल्या जाणाऱ्या धोनीला त्याच्या दक्षिण भारतीय चाहत्या वर्गाकडून थाला असे नाव मिळाले आहे आणि जे त्याला बरोबर शोभणारे आहे. आज-काल धोनीसाठी हे नाव खूप प्रसिद्ध झाले आहे. भारतातील अनेक भागांमध्ये धोनीला त्याच नावाने संबोधित केले जाते.
धोनी व्यतिरिक्त थाला या शब्दाचा उपयोग सुपरस्टार अजितकुमारसाठी केला गेला होता. कारण अजीत कुमार आणि धोनी मध्ये खूप सारे साम्य बघायला मिळते त्यामुळेच प्रेक्षक त्यांना थाला असे बोलतात. सोमवारी प्रॅक्टिस साठी धोनी जसा मैदानात उतरला त्यावेळी सगळीकडून धोनी- धोनी या नावाने मैदान गाजून गेले होते. लक्षणी धोनी मैदानावर खेळायला उतरला त्यावेळी त्याचे फॅन्स त्याला जोरात चीअर करत होते. धोनी न येताच क्षणी मोठमोठे शॉर्ट्स मारण्यास सुरुवात केली. धोनीचा शानदार षटकार बघून त्याच्यावर खूप खुश झाले व यावर्षीच्या मॅचमध्ये त्याच्याकडून चांगली खेळी खेळली जाईल अशी आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *