सर्वांचा लाडका मिस्टर बीन जगतो अशी अलिशान लाईफ !

359

रोवन एटकिंसन ही ती व्यक्ती आहे जिल्हा संपूर्ण जग मिस्टर बीन या नावाने ओळखते. 90च्या दशकातील प्रत्येक जण मिस्टर बीन चा चाहता वर्ग होता. मिस्टर बीन हा शो टीव्हीवर पाच वर्षे चालला. पाच वर्षात या शोने लोकप्रियतेची शिखरे पार केली होती. मिस्टर बीन या शो व्यतिरिक्त रोवनने ब्लैकेडर, नाईन ओ क्लॉक न्यूज, द सीक्रेट पोलीसमेन्स बॉल्स आणि द थीम ब्लू लाईन नाम या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांची लाईफ स्टाईल कशी आहे ते सांगणार आहोत.
रोवन एटकिंसनच्या अभिनयाच्या प्रेमात तर अनेक लोक पडले आहेत. बॅटमॅन सारखी प्रसिद्ध भूमिका निभावणारा अभिनेता क्रिस्टन बेल याने त्याच्या अभिनयाची सुरुवात रोवन पासून प्रेरणा घेऊन केली होती. क्रिस्टनने रोवन पेक्षा कमी वयात अभिनयाची सुरुवात केली होती. रोवन यांचा जन्म डरहम येथे झाला त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्डच्या क्वींस कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पूर्ण केले.
मिस्टर बीन म्हणजेच रोवन आठ हजार करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. रोवन एटकिंसन यांचे नाव ब्रिटनच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये घेतले जाते. त्यांचे स्टारडम हे अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांना पेक्षा खूप जास्त आहे. मिस्टर बीनचा लंडन येथे मोठा आलिशान महाल आहे.
या महालाची किंमत करोड रुपयांमध्ये आहे. रोवनला अभिनयासाठी युनायटेड किंगडम च्या महाराणीने २०१३ मध्ये कमांडर ऑफ द मोस्ट एक्सीलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या किताबाने गौरवले होते.
मिस्टर बीन ला महागड्या गाड्या खरेदी करण्याची खूप आवड आहे. त्यांच्याकडे जगातली महागडी गाडी म्हणून ओळखली जाणारी मैकलोरेन एफ १ ही गाडी आहे. १९९० च्या सुरुवातीस मैकलोरेन एफ १ या गाडीची किंमत सुमारे पाच लाख चाळीस हजार युरो इतकी होती. आणि आज जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कारची किंमत ८० ते १०० करोड रुपये इतकी आहे.
१४०० एपिसोड्स नंतर मिस्टर बीन शो बंद करण्यात आला . परंतु लोकांच्या रोवन एटकिंसन हे कायम लक्षात राहिले. काळानुसार अनेक नवीन शो टीव्ही वर येत गेले या नवीन शो बरोबर वेगवेगळे कॅरेक्टर सुद्धा येत गेले. परंतु मिस्टर बीन ची जागा कोणीही घेऊ शकले नाही. काही दिवसांपूर्वी मिस्टर बीन यांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होता. मिस्टर बीन रोवन एटकिंसन आणि रीचर्ड कर्टिस द्वारा निर्मित एक ब्रिटिश सिटकॉम् सुद्धा आहे हे लोकांच्या खूप पसंतीस पडले होते.