Headlines

बॉलिवूड मधील या कलाकारांचे नाते तुम्हालाही नक्कीच माहित नसेल, नंबर ४ आणि ५चे नाते पाहून थक्क व्हाल !

बॉलीवुड इंडस्ट्री भरपूर मोठी आहे. या इंडस्ट्रीमध्ये देशा-विदेशातून कलाकार येऊन प्रेक्षकांची मने जिंकत असतात. या बॉलिवूडच्या दुनियेत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे एकमेकांशी काही ना काही नाते संबंध आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड कलाकारांच्या नातेसंबंधांत बद्दल माहिती सांगणार आहोत.

1.प्रेम चोपडा व राजकपूर – बॉलीवूड मधील नामांकित अभिनेते प्रेम चोपडा व राज कपूर यांच्या मध्ये एक खास नातेसंबंध आहे. यांच्यातील नातेसंबंध म्हणजे प्रेम चोपडा यांची पत्नी उमा चोपडा ही राज कपूर यांची सख्खी बहीण आहे. म्हणजेच राज कपूर व प्रेम चोपडा एकमेकांचे व्याही आहेत.
प्रेम चोपडा यांनी त्यांच्या ६० वर्षीय चित्रपट कारकीर्दीत ३८० हून अधिक चित्रपट केले. राजकपूर हे एकेकाळचे सुप्रसिद्ध अभिनेता निर्माता दिग्दर्शक होते. त्यांनी ११ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले आहे. शिवाय त्यांना पद्मभूषण व दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले होते.

2.सोनम कपूर व रणवीर सिंह – रणविर सिंह सोनम कपूर यांचे सुद्धा काही नाते असू शकते हे कोणाला माहित नव्हते. मात्र या दोघांमध्ये भावा-बहिणीचे नाते आहे. रणवीर कपूरची आजी व सोनम कपूरची आजी या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. त्यामुळे बॉलीवूड मधील हे सुपरस्टार एकमेकांचे भाऊबहीण आहेत.
सोनम ने दिल्लीतील प्रसिद्ध उद्योजक आनंद आहुजा सोबत लग्न केले तर रणवीरने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत लग्न केले. रणवीरचा ८३ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता मात्र लॉक डाऊनमुळे तो पुढे ढकलण्यात आला.

3.इम्रान हाश्मी आणि आलिया – इम्रान हाश्मी व आलिया यांची जोडी ओनस्क्रीन कधीच दिसली नाही. मात्र खऱ्या आयुष्यात हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सोनम व रणवीर प्रमाणेच आलिया व इमरान सुद्धा एकमेकांचे भाऊबहीण आहेत. आलिया चे वडील महेश भट हे इम्रान हाश्मीचे मामा लागतात. त्यामुळे आलिया व इम्रान एकमेकांचे मावस भावंड आहेत.
4.श्रद्धा कपूर व लता मंगेशकर – गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे अख्ख जग चाहता वर्ग आहे. आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ही अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. श्रद्धाने तिचा अभिनय व नृत्याद्वारे प्रेक्षकांच्या मनात जागा तयार केली.
श्रद्धा कपूर व लता मंगेशकर यांच्यातील नाते फारच कमी लोकांना ठाऊक आहे ते म्हणजे श्रद्धा कपूर चे आजोबा लता मंगेशकर हे चुलत भाऊ-बहीण होते. त्यामुळे या नात्याने श्रद्धा कपूर ही लता मंगेशकर व आशा भोसले यांची नात लागते.

5.मोहनीश बहल आणि काजोल – आता आम्ही तुम्हाला नाते सांगता होते म्हणजे काजोल आणि मोहनीश बहल यांचे. मोहनीश बहल ची आई नूतन व काजोल ची आई तनुजा या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. त्यामुळे या नात्याने मोहनीष आणि काजोल दोघे बहीण-भाऊ आहेत.
काजोल सर्वात शेवटी तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने तानाजीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !