Headlines

बॉलिवुड ते दक्षिण चित्रपटाचे सर्वात महागडे दिग्दर्शक, नंबर ५ वाला तर आहे सर्वात महागडा !

चित्रपटात समाज मनाचा आरसा असतो. चित्रपटात पात्र, कथानक, प्रकाश योजना, अभिनेता, अभिनेत्री इत्यादी घटक तर महत्त्वाचे असतातच पण त्याचबरोबर चित्रपटाचा कणा म्हणून ओळखला जाणारा एक घटक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो तो म्हणजे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक. खरंतर “दिग्दर्शक” हा चित्रपटाच्या कथेला न्याय देत असतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून चित्रपटाची कथा विस्तारत जाते व पडद्यावर उत्कृष्टरित्या सादर होत असते. चित्रपटात मोठे सेट्स आणि महागडी शूटिंग लोकेशनसाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च होत असतो. जसे की चित्रपटातील अभिनयाचे मानधन असते त्याच प्रमाणे दिग्दर्शकसुद्धा त्यांचे मानधन आकारत असतात. जेवढा मोठा दिग्दर्शक तेवढं जास्त मानधन. म्हणूनच आज आम्ही आपल्याला अशाच काही दिग्दर्शकांबद्दल सांगणार आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात मानधनामध्ये फी आकरतात.
१. एस एस राजमौली- आज दिग्दर्शक राजमौली नाव महागड्या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये सर्वोत्तम स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेले आहे आणि आपल्या कुशल दिग्दर्शनाने “बाहुबली” हा चित्रपट बनवून सर्वांचे हृदय जिंकले आहे. ४५० कोटी रुपये मध्ये बनवलेल्या या चित्रपटाने १८१० कोटी रुपये चा वर्ल्ड वाईड कलेक्शन करून एक नवा इतिहास रचला बाहुबली या चित्रपटाचे केलेली दिग्दर्शन यामुळे त्या चित्रपटाची कथा आणि त्यातील सूक्ष्म रित्या केलेले दिग्दर्शन हे प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेते म्हणूनच काय या चित्रपटातील सर्व पात्र प्रेक्षकांना आवडू लागतात.
बातम्यांनुसार चित्रपटाच्या एकंदरीत नफ्यामध्ये एस एस राजमौली यांना शंभर कोटी रुपये मिळाले होते. जे आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही दिग्दर्शकाला एवढे पैसे मिळाले नव्हते म्हणूनच एस एस राजमौली हे महागड्या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये सर्वात उत्तम स्थान प्राप्त करतात.

२. रोहित शेट्टी- आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून गाड्यांना हवेत उडणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे चित्रपट खूप मोठ्या बजेटचे असतातच त्याशिवाय ते स्वतः एक बॉलिवूडमधील सर्वात महागड्या दिग्दर्शकापैकी एक आहेत. बातम्यांनुसार नुकताच चित्रपट निर्माती संगीता अहिर यांनी रोहित ला दक्षिणात्य चित्रपट ‘ईविल एनगल्फ्स’च्या हिंदी रीमेकसाठी २४ कोटी रुपये ऑफर केले आहे. त्या चित्रपटाचे नाव आणि त्यात अभिनय करणारे अभिनेता अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आली नाही.
रोहितने आतापर्यंत गोलमाल, गोलमाल अगेन, सिंघम असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहे आणि हे सारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.

३. राजकुमार हिरानी- राजकुमार हिरानी याचे नाव गुणवत्तापूर्ण चित्रपट करिता ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक छोटे पासून मोठे चित्रपट-दिग्दर्शन केलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार हिरानी एक चित्रपट दिग्दर्शक करण्यासाठी रोहित शेट्टी पेक्षा सुद्धा जास्त मानधन आकारतात.
राजकुमार हिरानी यांनी आत्तापर्यंत संजू, थ्री इडीयट्स , खडूस , पिके, मुन्नाभाई एमबीबीएस , लगे रहो मुन्नाभाई या सारखे सुपरहिट धमाल असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि हे चित्रपट आज सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

४. करण जौहर- धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत करण ने अनेक चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केले आहेत. आपल्या चित्रपटांमध्ये करण प्रचंड प्रमाणामध्ये पैशाची गुंतवणूक करत असतो आणि त्याच्या दुप्पट पैसे मिळवत असतो तसेच फोर्ब्स २०१९ या यादीमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रिटीच्या यादीमध्ये करण जोहरचे नाव समाविष्ट होते.
यांनी आतापर्यंत कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, स्टुडन्ट ऑफ द इयर, कुर्बान, दोस्ताना सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहे.
५. संजय लीला भंसाली- भंसाली आपल्या चित्रपटाच्या सेट्सला धरून बहुतेक वेळा चर्चेमध्ये असतात तसेच चित्रपट दिग्दर्शन करीत असताना चित्रपटाचा सेट आणि त्याचा विशिष्ट रंग हा त्यांच्या चित्रपटाला चार चांद लावत असतो. असं म्हटलं जातं की संजय लीला भंसाली चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन करून आपली आपले मानधन निश्चित करत असतात म्हणूनच या कारणामुळे त्यांचे नाव सर्वात महागड्या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये येते.
संजय लीला भंसाली यांनी आतापर्यंत रामलीला, पद्मावत सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला चित्रपटाची कथा आणि त्यातील पात्र तसेच त्या पात्रातील जिवंतपणा कसा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल, त्याच्याकडे संजय लीला भंसाली प्रामुख्याने लक्ष देत असतात म्हणूनच काय संजय लीला भंसाली महागड्या दिग्दर्शकांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करत असावेत. आपल्याला जर लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.