अखेर समजले, प्रियांकाने या कारणामुळे केले १० वर्ष छोट्या निक सोबत लग्न !

6338

संपूर्ण जगभरात सध्या दोनशेहून अधिक देश कोरोना व्हायरसशी झुंज देत आहेत. या कोरोना व्हायरस मुळे सध्या रोज जगभरातील हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. भारत सुद्धा या संकटाशी दोन हात करत आहे. त्यामुळे इतर देशाप्रमाणेच भारतात सुद्धा लॉक डाऊन घोषित केला गेला. या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटी सुद्धा आपआपल्या घरात कैद झाले आहेत.
अशातच सध्या सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या गोष्टी, थ्रोबॅक , फोटो आणि व्हिडिओंनी भरला आहे. सध्या प्रियंका चोपडा सुद्धा या काळात तिच्या पतीसोबत वेळ घालवीत आहे. नुकताच बॉलिवूडच्या या देसी गर्लचा म्हणजेच प्रियंका चोपडा चा इंटरव्यू खूप व्हायरल झाला. या मुलाखतीमध्ये प्रियंका चोपडा आणि तिच्या लग्नापासून ते पती पर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
प्रियांकाने सांगितले की, निक सोबत माझे लग्न ठरल्यानंतर अनेक लोकांनी मला टोमणे मारले होते. आमच्या बाबतच्या अनेक गोष्टी तयार केल्या गेल्या. आणि मी हे सर्व टोमणे ऐकूनसुद्धा २०१८ ला नीक सोबत लग्न केले. सोबतच या मुलाखतीत प्रियंकाने तिच्याहून दहा वर्षे लहान असलेल्या निक जोनास सोबत लग्न करण्यामागचे कारण सुद्धा सांगितले. मिडियामध्ये नेहमीच प्रियांका आणि निक जोनास मधील वयातील अंतरामुळे चर्चा होत असतात. फक्त मीडिया मध्येच नव्हे तर सोशल मीडियावर तर या दोघां वरून मीम्स सुद्धा खूप व्हायरल होत असतात.
काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने एका फॅशन मॅगझीनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने निकसोबत लग्न का केले या सर्व गोष्टींचा खुलासा केला. प्रियांकाने सांगितले की लोकांमध्ये नेहमीच आमच्या दोघांवरून अनेक वाईट गोष्टी बोलल्या जातात. जेव्हा मी या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हा मला खरंच खूप आश्चर्य वाटले. प्रियंका म्हणाली की जेव्हा कोणी मोठ्या वयाचा मुलगा त्याच्याहून खूप लहान असलेल्या मुली सोबत लग्न करतो तेव्हा कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे आपल्याकडे जेंडर भेदभाव का केला जातो हा प्रश्न प्रियांकाने उभा केला.
प्रियांकाने सांगितले की निक जोनस चे क्लोज हे गाणे ऐकून मी त्याला डेट करण्याचा निर्णय घेतला. या गाण्यात तो खूपच हॉट दिसत होता. तेव्हाच मी त्याला माझा जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. प्रियंकाने स्पष्टपणे सांगितले की मला आणि निकला आमच्या वयातील अंतराचा कधीच त्रास होत नाही. त्यामुळे दुसरे काय म्हणतील याचा आम्हाला फरक पडत नाही. निक आणि माझ्यामध्ये एक नियम आहे की आम्ही दोघे दोन किंवा तीन आठवड्याहून अधिक काळ एकमेकांशिवाय राहत नाही.
त्यासोबतच प्रियांकाने सांगितले की येणाऱ्या काही दिवसातच फॅमिली प्लॅनिंग करणार आहे. प्रियांकाच्या मते परिवार हा खूप महत्त्वाचा असतो आणि ती तिच्या परिवाराला पुढे नेऊ इच्छिते. मात्र त्यासाठी ती योग्य वेळेची वाट पाहत आहे. परिवार वाढवणेही अशी गोष्ट आहे देवाचा आशीर्वाद असेल तेव्हा होतेच.
प्रियांका चोपडाच्या कामा बद्दल बोलायचे झाल्यास तिला सर्वात शेवटी द स्काय इज पिंक या चित्रपटात पाहिले गेले होते. या संपूर्ण वर्षात प्रियांका खूप व्यस्त असेल कारण तिच्याकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियांका कडे एक सुपरहिरो फिल्म सुद्धा आहे. या चित्रपटाचे नाव वी कॅन बी हिरोज असे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !