अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’चा या व्यक्ती सोबत झाला साखरपुडा, वाढदिवसा दिवशी सांगितले लोकांना !

10063

आपल्या सर्वांसाठी आपला जन्मदिवस हा खूप खास असतो. त्यामुळे या दिवशी काहीतरी स्पेशल करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नुकताच वाढदिवस झाला. तिने तिच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर एक खास घोषणा करून तो आणखीनच खास बनवला. सोनाली सध्या युवा डान्सिंग क्वीन या रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत होती.
तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने तिचा साखरपुडा झाल्याची खुशखबर सर्वांना दिली. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या होणाऱ्या भावी पती सोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोनालीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव कुणाल बेनोडेकर असे आहे. या दोघांनी यावर्षी दोन फेब्रुवारीला साखरपुडा उरकला. सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिच्या साखरपुड्याचे वेगवेगळे फोटो टाकून खाली कॅप्शन मध्ये आमचा साखरपुडा २ फेब्रुवारी २०२० ला‌ झाल्याचे सांगितले.
सोनालीच्या या फोटोमध्ये ती साउथ इंडियन साडी मध्ये खूप सुंदर दिसत होती. तर कुणालने भारतीय धोतर आणि शेरवानी घातली होती. सोनाली आणि कुणालने दुबईमध्ये साखरपुडा केला. साखरपुड्याच्या वेळी दोघांचे परिवार आणि जवळील काही खास मित्र उपस्थित होते. सोनाली कुलकर्णीचा १८ मे ला वाढदिवस असतो. जन्मदिवस खास बनवण्यासाठी तिने याच दिवशी तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. सोनालीने इंस्टाग्रामवर कुणाल सोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला त्यानंतरच्या फोटोमध्ये एक डफली होती त्यावर त्यांच्या नावासोबत असत यांच्या साखरपुड्याची तारीख छापलेली होती.
तिसऱ्या फोटो मध्ये कुणाल व सोनाली मध्यभागी बसले होते आणि त्यांच्या आजूबाजूला या दोघांचा परिवार उभा होता असा फोटो आहे. सोनालीच्या नवऱ्याचे म्हणजेच कुणाल चे बालपण लंडन मध्ये गेले. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झाले‌. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं. आता तो कामानिमित्त दुबई येथे वास्तव्यास आहे.
सोनालीने स्वतःच्या मेहनतीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने एकाहून एक सरस चित्रपट दिले. सोनालीचे नटरंग चित्रपटातील अप्सरा आली हे गाणे खूप गाजले. विशेष म्हणजे सोनाली अभिनेत्री बनवण्याआधी पत्रकार म्हणून इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन आणि फिल्म प्रोडक्शन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. पण तिला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे ती या क्षेत्राकडे वळली.
सोनालीने अजिंठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २ , मितवा, क्लासमेट, नटरंग चित्रपटांमध्ये काम केले. सोनालीच्या नुकत्याच आलेल्या हिरकणी या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.