Headlines

चित्रपट देण्यासाठी निर्मात्यांच्या अभिनेत्री कडून काय मागण्या असतात एक त्याच्या तोंडून, नंबर ५ वालीला तर काय मागितलं बघा !

बॉलिवूडमधील अभिनेत्रींना त्यांच्या कामाच्या बाबतीत, कामाच्या ठिकाणी काही वेळेस विचित्र घटनांना सामोरे जावे लागले. आतापर्यंत अनेक टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रींनी चित्रपटसृष्टीतील सत्याबद्दल वाच्यता केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर अनेकदा वाईट प्रसंग आला आहे.

1. प्राची देसाई – प्राची देसाई ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्राचीला चित्रपटाच्या ऑफर्सच्या बदल्यात अनेक वेळा घाणेरड्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या. ती म्हणते की तिला अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग होण्यासाठी काही थेट ऑफर आल्या आहेत, ज्यासाठी तिने होकार दिल्यानंतरच तिला चित्रपटाची ऑफर मिळाली असती. अनेकवेळा निर्मात्यांनी यासाठी दबावही निर्माण केला.

2. मल्लिका शेरावत – मल्लिका शेरावतची प्रतिमा चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड अभिनेत्री अशी आहे. तिने आपल्या चित्रपटांमध्ये अप्रतिम इंटिमेट सीन्स दिले आहेत. अनेकवेळा कलाकारांनी तिला किस करायला सांगितले. तसेच सांगितले की जेव्हा ती त्याला कॅमेऱ्यासमोर किस करू शकते तर ऑफ कॅमेरा का नाही. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, इंडस्ट्रीत तिचा अनेकदा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला.

3. राधिका आपटे – हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली ३६ वर्षीय अभिनेत्री राधिका आपटेही इंडस्ट्रीत कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. तिला फोन आल्याचे तिने सांगितले. कॉलरने तिला सांगितले की, ‘आम्ही बॉलीवूडमध्ये एक चित्रपट करत आहोत आणि तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. पण तुम्ही ज्या व्यक्तीला भेटणार आहात त्याच्यासोबत झोपायला तुम्हाला चालेल का?’. अभिनेत्रीने रागाने त्या माणसाला नरकात जाण्यास सांगितले.

4. रवीना टंडन – आता बोलूया ९० च्या दशकातील प्रसिद्ध आणि सुंदर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबद्दल, तिने सांगितले होते की मला इंडस्ट्रीमध्ये ‘उद्धट’चे लेबल देण्यात आले कारण “मी कधीही मला हिरो जे करायला सांगायचे ते नाही कार्याचे, हास्याला सांगायचे मी हसत नसे, त्याच्या इशाऱ्यावर ऊठ म्हटलं की ऊठ बस म्हटलं की बस असं करत नसे.”

5. अंकिता लोखंडे – प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्यासोबतच्या घडलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी १९-२० वर्षांची होते, एका खोलीत एकटी बसली होती. मी स्वतः निर्मात्याच्या माणसाला विचारले की निर्मात्याला कोणती तडजोड हवी आहे, ‘मला जेवायला जावे लागेल का?’ उत्तर ‘हो’ होते. यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘तुमच्या निर्मात्याला तुमच्यासोबत झोपणारी मुलगी हवी आहे, टैलेंटेड नाही.’

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !