Headlines

करोडोंच्या मालकीण असूनही अविवाहित आहेत या अभिनेत्री, नंबर ४ आणि ५ अभिनेत्री पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

एखादा चित्रपट हिट झाला की या चित्रपटातील कलाकारां मागे वेगवेगळ्या चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागते. चित्रपटातून करोडो रुपये कमावतात. बॉलीवूड कलाकार वेगवेगळे रियालिटी शो, जाहिराती यांमार्फत स्वतःची कमाई करून घेतात. हे बॉलीवूड कलाकार स्वतःचे करिअर बनवण्यामागे एवढे मग्न होतात की काही वेळेस त्यांचे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष होते.

करिअर बनवणे पैसे कमावणे या नादात या कलाकारांचे लग्नाचे वय उलटून जाते व ते अविवाहित राहतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत ज्या करोडोंच्या मालकीण असूनही अजुनही अविवाहीत आहेत.

1. कटरीना कैफ – बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ ही अविवाहित अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटरिना आता ३६ वर्षांची असून ती अजूनही अविवाहित आहे. टाइम्सनाऊन्यूज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कॅटरिना कैफ कडे सध्या १२८ करोड रुपयांची संपत्ती आहे.
कॅटरीना सर्वात शेवटी सलमान खान सोबत भारत या चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

2. नयनतारा – साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील नामांकित अभिनेत्री नयनतारा ने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटवर्थ पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, नयनतारा कडे आता १.५ मिलियन म्हणजेच ७४ करोड रुपयांची संपत्ती आहे.
नयनतारा ३५ वर्षांची असून अजूनही ती अविवाहित आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट नुसार नयनतारा आणि विघ्नेश शिवान यांनी लग्न केले आहे. परंतु त्याची अधिकृत काही माहिती आम्हाला सापडली नाही.

नयनतारा लवकरच भारतातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‌’सई रे नरसिम्हा’ या चित्रपटात चिरंजीवी यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

3. यामी गौतमी – उरी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करणारी अभिनेत्री यामी गौतमी आता ३० वर्षांची झाली. मात्र अजूनही अविवाहित आहे. हायलाइट्स इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार यामी गौतमी कडे सध्या ६ मिलियन डॉलर म्हणजेच ४२ करोड रुपयांची संपत्ती आहे.
4. तब्बू – बॉलीवूड ची नामांकित अभिनेत्री तब्बू आता ४६ वर्षांची झाली आहे.तब्बू ने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपट केले मात्र अजूनही तिने लग्न केले नाही. हायलाईटस् इंडिया डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार तब्बूकडे सध्या दोन मिलीयन डॉलर्स म्हणजेच १४ करोड रुपयांची संपत्ती आहे.
सर्वात शेवटी तब्बू दे दे प्यार दे या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने अभिनेता अजय देवगनच्या विरुद्ध काम केले होते.

5. सुष्मिता सेन – अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या चित्रपटांपेक्षा अफेयर्समुळे जास्त चर्चेत असते. सुश्मिताचे आतापर्यंत अनेकांशी नाव जोडले गेले होते. सध्या सुश्मिताचे वय ४३ असं नाही तिने लग्न केलेले नाही.
हायलाइट्स इंडिया डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सुष्मिता सेन कडे सध्या सात करोड रुपयांची संपत्ती आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !