Headlines

कुंडलीत मंगळ दोष आहे ? जाणून घ्या मंगळा बाबतचे गैरसमज, प्रभाव आणि उपाय !

वैदिक ज्योतिषात मंगळ आपल्या नात्यावर, मनावर अधिराज्य गाजवतो. प्रत्येक पत्रिकेत मंगळाची स्थिती महत्त्वपूर्ण असते. मंगळ म्हणजेच मंगळ दोष होय. जेव्हा कोणाची पत्रिका मंगळाच्या विशेष गुणांनी जोडली असेल किंवा त्याचा त्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडत असेल तर तो मंगळ दोषाने प्रभावित आहे असे समजावे. मंगळ दोषाचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव वैवाहिक जीवनावर पडतो.

मंगळ दोष आढळून आल्यास वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतो तसेच काही वेळेस विवाहात बाधा येते. कधी कधी तर मंगळ दोषाचा प्रभाव इतका तीव्र असतो की वैवाहिक जीवन तुटण्याची शक्यता असते. मंगळ दोष असलेल्या व्यक्तीचा विवाह समान भाव मांगलिक व्यक्ती सोबत झाल्यास उत्तम ठरते. ज्यामुळे कमी दोष निर्माण होतात. असे न केल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

मंगळ दोष म्हणजे काय?
जर कोणत्या पत्रिकेतील लग्न भाव, चतुर्थ भाव, सप्तम भाव, अष्टम भाव, द्वादश भाव यांमध्ये मंगळाचे स्थान असल्यास त्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असतो.

मंगळ दोषामुळे होणारे परिणाम-
जेव्हा लग्नात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ असल्यास ती व्यक्ती स्वभावाने खूप रागीट, तीक्ष्ण आणि अहंकारी असते.
सप्तम भावात मंगळ असल्यास वैवाहिक संबंधात अडचणी येतात. अष्टम भावात मंगळ असल्यास वैवाहिक जीवनात सुख मिळत नाही तसेच सासरकडील नाते संबंधात बिघाड येते. द्वादश भावातील मंगळ वैवाहिक जीवनात अडचणी, रोग, कलह, शारीरिक क्षमतेत अभाव निर्माण करतात.

मंगळा बाबतचे गैरसमज – मंगळ दोषाच्या बाबतीत अनेक अफवा पसरल्या आहेत. जसे की मंगळ दोष असलेल्या व्यक्तीने अमंगळ व्यक्तीशी लग्न केल्यास ते लग्न तुटते. मात्र याबाबतीत वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात मात्र ते लग्न तुटेल असे नाही. मंगळ दोषाच्या बाबतीत असेही म्हटले जाते की त्या व्यक्तीने वटवृक्षा सोबत विवाह केला पाहिजे असे करणे देखील चुकीचे आहे.

मंगळवारी जन्मणाऱ्या व्यक्तींना मंगळ असते असे मानणे देखील चुकीचे आहे कुठल्याही दिवशी जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ असू शकतो. काही जणांचे म्हणणे आहे की मंगळासोबत गुरु किंवा शनीची युती झाल्यास मंगळदोष समाप्त होतो. मात्र हा निव्वळ भ्रम आहे. जर गुरूची दृष्टी मंगळावर असेल आणि गुरु मध्यभागी असेल तर मंगळ दोष संपतो हेदेखील खरे नाही.

खरेतर कोणताही ग्रह मंगळाच्या दोषाचा वि ना श करु शकत नाही. जरी मंगळाचा अस्त झाला तरीही मंगळ दोषाचा प्रभाव कमी होत नाही. वयाची २७ वर्षे पूर्ण झाल्यावर मंगळाचा दोष संपतो ही अफवा तर इतकी जास्त पसरली आहे की ती थांबवणे शक्य नाही. काही रूढीवादी लोकांचे म्हणणे आहे की जर मुलाला मंगळ असेल तर मुलीला देखील मंगळ असणे आवश्यक नाही. याचा परिणाम त्या दांपत्याला आयुष्यभर भोगावा लागतो.

मंगळातून सुटका कशी ?
ज्योतिष शास्त्र कोणताही योग्य किंवा दोष यांमधील स्पष्टता करण्यास सक्षम आहे. काही पूजापाठ दानधर्म करून मंगळदोषात सुधार आणू शकतो. मात्र कोणताही दोष पूर्णपणे समाप्त होईलच असे म्हणणे अनुचित होणार नाही. जर कोणा व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ असल्यास त्याचा संबंध सुद्धा मंगळ असलेल्या व्यक्तीशी जोडला जावा.

उपाय – काही सामान्य उपाय करून मंगळ दोषाचा प्रभाव नियंत्रित केला जाऊ शकतो किंवा ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात मंगळ असल्यास पुढील उपाय करून शांती आणण्याचा प्रयत्न करावा. यावरील सर्वात मोठा उपाय म्हणजे मंगळ दोष असलेल्या व्यक्तीचा स्वतःवर व स्वतःच्या अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवणे.

1. लाल शाईने पिवळ्या कागदावर लिहिलेली श्री हनुमान चालीसा नित्य नियमाने दररोज श्रद्धेने वाचा. 2. भगवान शिवशक्तीची मनोभावे एकत्र पूजा करा. 3. शिवलिंगावर लाल रंगाचे फूल अर्पण करा. 4. मंगळवारी लाल मसुराचे करा. ते नसल्यास गुळाचे दान केले तरीही चालेल. 5. मंगळवारच्या दिवशी मजुरांना जेवण द्या. 6. हे काही सामान्य उपाय मंगळ दोष असलेल्या व्यक्ती करू शकतात. उज्जैन येथील मंगलनाथ देवाची अनुष्ठान पूजा मंगळ दोष घालवण्यास केली जाते.
भगवान शिव शंकर आपल्या सर्व अडचणी दूर करो. कमेंट मध्ये जय भोलेनाथ नक्की लिहा.

टीप – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.