Headlines

घर बसल्या पाकीटात बसेल असे आधार कार्ड मिळवा फक्त ५० रुपयात, जाणून घ्या कसे ऑनलाईन ऑर्डर करायचे !

कोणतेही काम करायचे असल्यास सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग आयडी यांसारखी ओळखपत्रे महत्त्वाचे असतात. सध्याच्या काळात आधार कार्डला तर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मग ते घरचे काम असो किंवा कोणतेही सरकारी काम सगळीकडे आधार कार्डचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे तुमचे आधार कार्ड सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.

मात्र हे आधार कार्ड आकाराने मोठे असल्यामुळे आपण सगळीकडे घेऊन जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यूआयडीएआय ने आता एटीएम कार्ड सारखे दिसणारे आधार कार्ड तयार केले आहे. हे आधार कार्ड तयार करण्यासाठी फक्त पन्नास रुपये खर्च येतो. हे कार्ड एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड प्रमाणे तुमच्या पॉकेटमध्ये सहज राहू शकते. चला तर जाणून घेऊ घर बसल्या हे पॉकेट साइज आधार कार्ड कसे ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

युआयडीएआय ने स्वतः ट्विट करून सांगितले की आधार पीव्हीसी कार्ड तुम्ही फक्त ५० रुपयात बनवून घेऊ शकता. हे तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्यानंतर डिपार्टमेंट कडून पाच दिवसांनी ते तुमच्या घरी पाठवले जाईल.

अशा प्रकारे करू शकता ऑनलाईन ऑर्डर – १.नवीन आधार पीवीसी कार्ड तयार करण्यासाठी यूआयडीएआय च्या वेबसाईटवर जा. २.वेबसाइट ओपन झाल्यावर माय आधार या सेक्शनमध्ये जाऊन ऑर्डर आधार पीवीसी कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा. ३. त्यानंतर तेथे आधारचा १२ डिजिट नंबर किंवा १६ डीजीट असलेला वर्चुअल आयडी किंवा २८ डीजीटचा आधार एनरोलमेंट आयडी घाला.

 

४. नंतर तेथे सिक्युरिटी कोड घालून ओटीपी साठी सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करा. ५. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तेथे एंटर करा. ६. आता तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचा एक प्रीव्ह्यू दिसेल.
७. त्यानंतर त्याखाली असलेल्या पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा. ८. त्यानंतर पेमेंट पेजवर जाऊन पन्नास रुपये फी जमा करा.

९. पेमेंट पाठवल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्ड ची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही ही सर्व प्रक्रिया पूर्ण कराल त्यानंतर पुढील पाच दिवसाच्या आत युआयडीआय तुमचे आधार पीव्हीसी कार्ड प्रिंट करून पोस्टात पाठवून देईल त्यानंतर पोस्टाकडून ते कार्ड तुमच्या घरी येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !