Headlines

केसगळतीने त्रस्त आहेत का ? करा हे सोपे घरगुती उपाय आणि मिळवा केसगळती पासून कायमची मुक्ती !

केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत, स्त्री असो व पुरुष केसगळती ही प्रत्येकाची समस्या आहे. काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात.

केसगळतीवर आपण काही घरगुती उपचार करू शकतो, या उपायांमुळे केसगळती कमी होऊन केस पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे सर्व पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ते सहज आजमावू शकतो. तर पाहुया कोणते आहेत हे उपाय !

कडुनिबांची पाने – कडुनिंबामध्ये अनेक औषधी गुण आहेत. कडुनिंबाचा वापर करून अनेक समस्यांवर मात केली जाऊ शकते. केसगळती होत असल्यास कडुनिंबाच्या पाण्याने केस धुवावेत. यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त आपण कडुनिंबाच्या पानांचा लेप देखील केसांना लावू शकतो. कडुनिंबाच्या पानांचा लेप केसांवर लावल्याने रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते आणि केसगळती बंद होते.

केस धुण्यासाठी कडुनिबांचं पाणी तयार करण्यासाठी कडुनिंबाची पानं पाण्यामध्ये उकळून घ्यावी आणि ते पाणी थंड झाल्यावर ते पाणी गाळून घ्यावं. मग त्या पाण्याने केस धुवावेत. सोबतच कडुनिंबाच्या पानांचा लेप तयार करण्यासाठी २० ते ३० पाने घेऊन ती ठेचावी. त्यानंतर हा लेप १५ मिनिटे आपल्या केसांना लावावा. महिन्यातून एकदा हा उपाय अवश्य करावा. केसगळतीच्या समस्येपासून आपली नक्कीच सुटका होईल.

मेथी – मेथी केसांसाठी फारच गुणकारी आहे. मेथी केसांना लावल्याने केस मजबूत देखील होतात. एक वाटी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत घालावेत आणि दुसऱ्या दिवशी ती मेथी मिक्सरला लावून वाटून घ्यावी. मग त्यामध्ये नारळाचे तेल घालून ते मिश्रण एकत्र करून केसांना लावावे.

हे मिश्रण अर्ध्या तासासाठी केसांना लावून ठेवावे व त्यानंतर केस पाण्याने धुवून टाकावेत. मेथीमुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. तसंच यातील घटक केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरच्या स्वरुपात काम करतात. मेथीमुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. तसंच यातील घटक केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरच्या स्वरुपात काम करतात. यामुळे तुमचे केस मजबूत होऊन केसगळती बंद होईल.

कांदा – कांदा देखील केसांकरिता अत्यंत गुणकारी मानला जातो. केसगळती सुरु झाल्याबर कांद्याचा रस केसांना लावावा. कांद्याच्या रसामुळे केसांतील बॅक्टेरीया आणि फंगस नष्ट होते. कांद्याचे तुकडे करुन केसांवर १२-१५ मिनिटे घासल्यास केस लवकर येण्यास मदत होईल.

कांद्याच्या या रसाव्यतिरिक्त रोजच्या आहारात कांद्याचा समावेश करत रोज एक कांदा खावा. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला चालना मिळते व केसांची गळती थांबण्यास मदत होते.

लोहयुक्त पदार्थांचं सेवन – अनेकदा शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास केस गळती सुरु होते. त्यामुळे रोजच्या हातात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे. लोहयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्ताचे कमी झालेले प्रमाण वाढून केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !