Headlines

या बॉलीवूड मधील कलाकारांची झाली आहेत एकापेक्षा अधिक लग्न !

बॉलीवूड म्हटले की सर्वांचा चर्चेचा विषय येतोच. इथे चर्चेच्या विषयांसाठी कोणतीच कमी नाही. त्यांच्या लव अफेअर पासून ते लग्नापर्यंत अनेक विषयांवर सोशल मीडियावर चर्चा या होतच असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर तीन-तीन लग्न केली आहेत. या कलाकारांमध्ये किशोर कुमार पासून केबिर बेदी आणि संजय दत्त यांचे नाव सहभागी आहे. त्याचप्रमाणे धर्मेंद्र, आमिर खान आणि दिलीप कुमार तसेच सैफ अली खान सुद्धा या यादीत समाविष्ट आहेत. यामध्ये केव्हा अभिनेते नव्हे तर काही अभिनेत्री सुद्धा आहेत ज्यांनी एकहून अधिक लग्न केले आहेत.

संजय दत्त – मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. मान्यताने संजय दत्त सोबत २००८ मध्ये लग्न केले होते. मान्यता सोबत लग्न करायच्या आधी संजयने त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लई सोबत घटस्फोट घेतला होता. संजयच्या पाहिल्या पत्नीचे नावं ऋचा शर्मा असे होते. तिचा ब्रेन ट्युमर मुळे १९९६ मध्ये मृत्यू झाला होता. संजय आणि ऋचा चे लग्न १९८७ मध्ये झाले होते. ऋचा पासून संजयला एक मुलगी सुद्धा आहे. जिचे नावं त्रिशाला असे आहे.
किशोर कुमार – सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. किशोर कुमार यांनी त्यांचे पहिले लग्न वयाच्या २१ व्या वर्षी केले होते. किशोर कुमार यांची पहिली पत्नी बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका होती. तिचे नाव रुमा गुहा ठाकूर असे असून किशोर कुमार यांनी तिच्यासोबत लग्नाच्या आठ वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर किशोर कुमार यांनी १९६० मध्ये बॉलिवुड ची प्रसिद्ध अभिनेत्री मानली जाणारी मधुबाला सोबत कोर्ट मॅरेज केले होते. परंतु १९६९ मध्ये मधुबाला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर किशोर कुमार यांनी १९७६ मध्ये अभिनेत्री योगिता बाली सोबत लग्न केले. मात्र हे लग्न केवळ दोन वर्षेच टिकू शकले. योगिता बाली सोबत घटस्फोट घेतल्यानंतर २ वर्षांनी किशोर कुमार यांनी अभिनेत्री लीना चंद्रावरकर सोबत १९८० मध्ये चौथे लग्न केले.
करण सिंह ग्रोवर – अभिनेता आणि मॉडेल असलेल्या करण ग्रोवर ने काही वर्षांपूर्वीच बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बासू सोबत तिसरे लग्न केले. या आधी करण ने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि श्रद्धा निगम सोबत लग्न केले होते आणि त्यांच्यासोबत घटस्पोट देखील झाला होता.
नीलिमा अजीम – अभिनेत्री नीलिमा अजीम ने तीन लग्न केली आहेत. नीलिमाने पाहिले लग्न पंकज कपूर सोबत केले होते. त्यानंतर निलिमाने राजेश खट्टर सोबत दुसरे लग्न केले. त्यांच्यापासून नीलिमाला एक मुलगा ईशान आहे. मात्र २००१ मध्ये नीलिमाचा राजेश खट्टर यांच्याशी घटस्फोट झाला. आणि शेवटी नीलीमाने तिचा बालपणीचा मित्र उस्ताद रजा अली खान सोबत तिसरे लग्न केले.
विधू विनोद चोपडा – चित्रपट निर्माते विधू विनोद चोपडा यांनी तीन लग्न केली आहेत. त्यांनी चित्रपट लेखिका असणाऱ्या अनुपमा चोपडा सोबत १९९० मध्ये तिसरे लग्न केले. अनुपमा यांचा आधी विधू यांचे रेनु सलुजा आणि शबनम सुखदेव यांच्यासोबत सुद्धा लग्न झाले होते.
सिद्धार्थ रॉय कपूर – सिद्धार्थ रॉय कपूर ने अभिनेत्री विद्या बालन सोबत तिसरे लग्न केले. विद्याच्या आधी सिद्धार्थचे त्याची बालपणीची मैत्रीण आरती बजाज सोबत पाहिले लग्न झाले होते. त्यानंतर टिव्ही मालिका निर्माती कविता यांच्या सोबत दुसरे लग्न झाले. या दोघांसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी विद्या बालन सोबत तिसरे लग्न केले. बॉलिवुड मध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकहून अधिक लग्न केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *