मुकेश अंबानी अशा प्रकारे पैसे खर्च करतात, आणि एवढे पैसे कमावतात !

508

सध्या सर्वांच्या जीवनातील अत्यावश्यक घटक म्हणजे पैसा. सर्वसामान्य माणसाला पैसा कधी कसा कुठे खर्च होतो हे समजत नाही. अनेक छोट्या मोठ्या जीवनावश्यक किंवा चैनीच्या गोष्टी घेण्यात पैसे खर्च होतात. अनेकदा माणसे असाही विचार करतात की श्रीमंत लोक त्यांचा पैसा कसा खर्च करीत असतील. तर मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या बद्दल सांगणार आहोत. की ते कशा प्रकारे पैसे खर्च करतात.
मुकेश अंबानी हे एक भारतातील सर्वाधिक यशस्वी बिझनेसमन पैकी एक आहेत. जर असे म्हटले की मुकेश अंबानी फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील यशस्वी बिझनेसमन पैकी एक आहेत तरी चुकीचे ठरणार नाही. मुकेश अंबानी यांना ही एवढी संपत्ती एका झटक्यात मिळाली नाही किंवा त्यांची ही वडिलोार्जित संपत्ती देखील नाही. मुकेश अंबानी यांनी ही सर्व संपत्ती स्वतः च्या मेहनतीवर उभी केली आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांच्या वडिलांच्या टेक्सटाइल कंपनी मध्ये मदत करू लागले.
त्यानंतर हळू हळू मुकेश स्वतः च्या मेहनतीवर पुढे जाऊ लागले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मुकेश अंबानी यांच्या संपत्ती बद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की ते ६ महिने संपूर्ण भारतातील लोकांना फुकट जेवायला देऊ शकतात. मुकेश अंबानी प्रत्येक मिनिटाला २ लाख ३५ हजार रुपये कमवतात. तर प्रत्येक तासाला १ कोटी ४० हजार रुपये कमवतात.
मुकेश अंबानी यांचे घर हे जगातील सर्वात महागडे घर आहे. आता सध्याच्या घडीला मुकेश अंबानी यांच्या घराची किंमत ही २ अरब डॉलर इतकी आहे. त्यांच्या घराचे नावं एंटेलिया असे असून ते कोणत्याही राजमहाल पेक्षा कमी नाही. त्यांच्या घरात एका वेळी १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. या व्यतिरिक्त ३ हेलिपॅड, हेल्थ केअर सेंटर, जिम , स्पा, आणि मंदिर सुद्धा आहे. हे घर ४० हजार स्क्वेअर फूट मध्ये बनले आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासाठी ११०० करोड रुपये खर्च आला होता. याव्यतिरिक्त त्यांच्या घरात ६०० नोकर काम करतात. या नोकरांच्या पागराबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना २५ लाख ते ३५ लाख इतका पगार आहे. मुकेश नेहमी BMW या गाडीने फिरतात त्या गाडीची किंमत ८० लाख रुपये इतकी आहे. तसेच मुकेश अंबानी यांनी त्यांच्या पत्नीस म्हणजेच निता अंबानी यांना एक एयरबस गिफ्ट दिली होती. जिची किंमत २४२ करोड इतकी आहे.