Headlines

शेकडो गाणे हिट देऊन सुद्धा बॉलिवूडने या गायिकीकडे फिरवली पाठ, हे आहे कारण !

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यानंतर ज्यांची गाणी सर्वात जास्त प्रसिद्ध झाली त्या गायिका आहेत अल्का याग्निक. ९०च्या दशकात बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपटातील गाण्यांमध्ये अल्का यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असे. कोणताही चित्रपट अल्का यांच्या गाण्यांशिवाय अपूर्ण वाटत असे. अल्का याज्ञिक २० मार्च रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि यंदा त्यांचा ५४वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आम्ही आपल्याला अल्का यांच्या बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील.
अल्का यागनीक यांनी एकंदरीत ३० वर्षे आपल्या मधुर आवाजाने बॉलिवूडवर सुरेल राज्य केले.  त्यांना पार्श्वगायिका म्हणून त्यांना २ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. अल्का यांचा जन्म कोलकात्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आपली आई शुभा याग्निक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती.
घरात संगीताचे वातावरण असल्यामुळे त्यांना संगीताची गोडी निर्माण झाली. त्यांनी वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी काम करण्यास सुरवात केली होती.अल्का  कोलकाता आकाशवाणी केंद्रामध्ये गाऊ लागल्या होत्या. सोबतच त्या  भजन देखील गात असे. वयाच्या दहाव्या वर्षी त्या आईसोबत मुंबईत आल्या आणि चित्रपट निर्माता राज कपूर यांना भेटल्या.

राज कपूर यांना अल्का यांचा आवाज खूप आवडला आणि त्यांनी त्याची ओळख लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी करुन दिली. अल्का यांनी आपल्या पार्श्वगायिका म्हणून आपल्या करिअर ची सुरुवात १९७९ मध्ये आलेल्या ‘पायल की झंकार’ या चित्रपटाद्वारे केली. जेव्हा अल्का यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘लावारिस’ चित्रपटामधील ‘मेरे अंगणे में’ हे गाणे गायले तेव्हा ते खूप गाजले होते.
असे असूनही अल्का यांना बॉलिवूडमध्ये स्थिरता मिळवण्यासाठी तब्बल ८ वर्षे संघर्ष करावा लागला. १९८८मध्ये आलेला ‘तेजाब’ या चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यानंतर अल्का यांना पार्श्वगायिका म्हणून खरी ओळख मिळाली.  यानंतर, अल्का यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अल्का यांनी आतापर्यंत ११०० चित्रपटांमध्ये २४००हून अधिक गाणी गायली आहेत.
अल्का यांनी १९८९ मध्ये नीरज कपूरसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी, सायशा आहे. अल्का ह्या गेले २७ वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळे राहत आहे. वर्ष १२ डिसेंबर २०१८ रोजी अल्का यांनी त्यांच्या मुलीचे लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.  अल्का ह्या बॉलिवूडमधील सुपरहिट पार्श्वगायिका होत्या परंतु त्यांची मुलगीने नेहमीच फिल्म इंडस्ट्रीपासून अंतर ठेवले. अल्का यांनी ५ वर्षापूर्वी चित्रपट तमाशा मधील अगर तुम साथ हो हे गाणे गायले होते जे अभिनेत्री दीपिका पादुकोणवर चित्रीत करण्यात आले होते.
अल्का याग्निक गेल्या काही वर्षांपासून गाणे गात नाहीयेत. ज्याचे कारण ते सध्या संगीतातील असलेले बदल कारणीभूत आहे असे त्या मानतात. गायन करत नाही. यामुळे, त्या आजच्या संगीतातील झालेला बदल विचारात घेतात. बॉलिवूड गाण्यांमध्ये इतका बदल झाला आहे की कुमार शानू, उदित नारायण, अल्का याज्ञिक या सारख्या ९०च्या दशकातील गायकांना काम मिळणे अवघड झाले आहे. अल्का यांचा असा विश्वास आहे की बॉलिवूडमध्ये गाण्यांचा प्रेमळ मंजुळ ध्यास हरवला आहे आणि त्याची जागा धागडधिंगाने घेतली आहे.
त्यांचा मधुर आवाज आणि त्यांची असलेली राहणीमान,स्वभावातील गोडवा हेच त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी आता पर्यँत अनेक गाण्याचे रियालिटी कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे तरी त्या सध्या आपल्याला बॉलिवूडमधील कोणत्याही नवीन चित्रपटातील गाणे गाताना दिसत नाहीये यावरूनच बॉलिवूडने त्यांच्याकडे पाठ फिरवली असे म्हणण्यास हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *