सनी लियोनीला या दिग्गज अभिनेत्याने मागीतला पर्सनल नंबर, बदल्यात अभिनेत्रीने दिले हे उत्तर !

1492

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांचे कॅलेंडर २०२० सध्या खूप चर्चेत आहे. डब्बू रतनानी यांनी आपल्या कॅलेंडरमध्ये सनी लियोनी, विद्या बालन, भूमि पेडनेकर, विकी कौशल, वरुण धवन, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, सैफ अली खान, जॉन अब्राहम, अनुष्का शर्मा, कियारा आडवाणी, कृति सेनन, परिणीति चोपड़ा आणि टाइगर श्रॉफ यांना सहभागी केले आहे. कॅलेंडर साठी सनी लियोनी, कियारा आडवाणी, भूमि पेडनेकर आणि विकी कौशलने न्यूड फोटोशूट केले आहे. तसेच कॅलेंडरच्या उदघाटन कार्यक्रमाच्या दरम्यान असे काही झाले कि ते खूप रंजक होते आणि माध्यमांच्या चर्चेचा तो एक विषय ठरला.
सनी लियोनी यांनी कबीर बेदी यांना दिला हा वाला नंबर – सूत्रांनुसार डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर २०२०च्या उदघाटन कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. चित्रपट अभिनेता कबीर बेदी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान कबीर बेदी आणि सनी लियोनी एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले आणि याच दरम्यान कबीर बेदी यांनी सनी लियोनी यांच्या कडून त्यांचा मोबाइल नंबर मांगीतला. खरंतर सनी लियोनी यांनी कबीर बेदी यांना आपला पर्सनल नंबर नाही दिला तर पती डैनियल वेबरचा मोबाइल नंबर दिला.
आता चाहत्यांना सेल्‍फी नाही देणार सनी लियोनी – आपणास सांगू इच्छितो कि, सनी लियोनी बद्दल नुकतीच एक बातमी अली होती. खरंतर चीन मधील कोरोना वायरसच्या प्रकोप आणि भारतमध्ये या व्हायरसचे संशयित रुग्ण समोर आल्यामुळे सनी लियोनी यांनी निर्णय घेतला कि आता ते चाहत्यांना सेल्‍फी काढू नाही देणार. गेल्यावेळी जेव्हा त्या आपल्या पतीसोबत विमानतळावर दिसल्या तेव्हा त्यांनी आपला चेहऱ्यावर मास्क लावला होता. सनी लियोनी यांनी गेल्या काही दिवसांत निर्मिती क्षेत्रात आपले पाऊल ठेवले आहे. सध्या त्या आपल्या पतिसोबत एका चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहेत.
अमिताभ यांच्या फोटोंवर रेखा यांनी दिली हि प्रतिक्रिया – कॅलेंडर कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री रेखा सुद्धा पोहचल्या होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यान रेखा आणि डब्बू रतनानी यांची मुलगी रॅम्प वॉक करत होत्या आणि कार्यक्रमात उपस्थित राहिलेले फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत होते. याच दरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या फोटोला पाहिले तर त्यांनी ‘यहां डेंजर जोन है’ असे बोलून त्या जागेवरुन निघुन गेल्या. रेखा यांची हि प्रतिक्रिया पाहून उपस्थित लोकांना हसू आवरले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर खुप व्हायरल होत आहे.
कॅलेंडरसाठी विद्या बालन यांनी केले बाथरोबमध्ये फोटोशूट – डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर उदघाटन कार्यक्रमात रेखा, सनी लियोनी, विद्या बालन, भूमि पेडनेकर, जॅकी श्रॉफ, उर्वशी रौतेला, शर्लिन चोपड़ा, अनु मलिक, ईशा कोप्पिकर, कबीर बेदी, अर्जन बाजवा, विकास गुप्ता, प्रियांक शर्मा आणि आमिर अली सारख्या दिग्गज मंडळींचा समावेश होता. खरंतर डब्बू रतनानी यांचे या वेळचे कॅलेंडर खूपच बोल्ड आहे. कॅलेंडर साठी चित्रपट अभिनेत्री विद्या बालन यांनी सुद्धा बाथरोबमध्ये फोटोशूट केले आहे.