Headlines

कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये नवीन व्हायरस ‘हंता’, असा पसरतो हा व्हायरस !

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना आता नवीन एक संकट जगासमोर येऊन ठेपले आहे. कोरोना व्हायरस ने हजारो लोकांचे प्राण घेतल्यानंतर नवीन एक व्हायरस लोकांच्या मृत्यूचे कारण ठरू शकतो. या नवीन व्हायरसचे नाव हंता व्हायरस असे आहे. एका रिपोर्टनुसार या नव्या व्हायरसमुळे चीनमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर सुद्धा या नवीन व्हायरस बद्दल खूप चर्चा होत आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे तांडव सुरु असतानाच एक नवीन बातमी कानावर येऊन पडली, चीनच्या युनान प्रांतांमधील एका इसमाचा सोमवारी हंता व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यू झाला. हा पीडित इसम कामानिमित्त बस मधून शाडोंग या प्रांतात जात होता. बस मध्ये त्याच्यासोबत असलेल्या इतर ३२ जणांची सुद्धा चाचणी केली गेली. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स ने दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर खूप गोंधळ निर्माण झाला आहे.

नव्या व्हायरसच्या महामारीच्या भीतीमुळे लोक आधीपासूनच लॉकडाऊन च्या वार्ता करीत आहेत. एक युजर्सचे असे म्हणणे आहे की जर चीनमधील लोकांनी जनावरे मारून खाण्याचे थांबविले नाही तर असे वेगवेगळे व्हायरस माणसांच्या जीवासाठी घातक ठरू शकतात.
नक्की काय आहे हे हंता व्हायरस ?
कोरोना व्हायरसच्या तुलनेत हंता व्हायरस तितकेसे हानिकारक नाही. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की हा व्हायरस कोरोना व्हायरस सारखा हवेमार्फत श्वासातून शरीरात जात नाही. परंतु जी माणसे उंदीर किंवा गिधाडांच्या संपर्कात येतात अशा व्यक्तींनाच हा व्हायरस संक्रमित करतो. सेंटर फॉर डीजिज कंट्रोल ॲंण्ड प्रिव्हेन्शनच्या मते उंदीरांमुळे हंता व्हायरस पसरण्याचा धोका खूप आहे. जर कोणी निरोगी व्यक्ती हंता व्हायरच्या संपर्कात आल्यास त्याला हा व्हायरस लगेच संक्रमित करू शकतो. परंतु हा व्हायरस एका व्यक्ती मधून दुसऱ्या व्यक्तीत जात नाही. परंतु जर कोणा एका व्यक्तीने उंदराच्या मलमुत्रास चुकून स्पर्श केल्यास आणि त्यानंतर हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यास हा व्हायरस त्या व्यक्तीस होऊ शकतो.

हा व्हायरस संक्रमित झालेल्या व्यक्तीस ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोट दुखी, उलटी डायरिया यांसारखे आजार होतात. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या उपचारास उशीर झाल्यास त्या व्यक्तीच्या फुप्फुसांमध्ये पाणी भरू शकते. ज्यामुळे त्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
हंता व्हायरस खरंच जीवघेणा ठरू शकतो का?
हंता व्हायरस हा घातकारी आहे. सीडीसी च्या मते हा व्हायरस संक्रमित झाल्यावर एका वेळी ३८ लोकांचा मृत्यू होऊ शकतो. चीनमध्ये आधीपासूनच लोक कोरोना व्हायरस मुळे चिंतेत असताना हा नवीन व्हायरस उभा ठाकल्याने संपूर्ण वातावरण भीतीदायक झाले आहे.
कोरोना व्हायरसला संयुक्त राष्ट्राने वैश्विक महामारी असे घोषित केले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात सोळा हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण जगात ३ लाख ८२ हजार लोकांना कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे. आतापर्यंत हा कोरोना व्हायरस १९६ देशांमध्ये पसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *