Headlines

सुट्टीमध्ये काय करत आहे सिद्धी आणि शिवा, येथे पहा !

मालिकांचे शूटिंग सध्या बंद असल्याने कलाकारांना बर्‍याच दिवसांनी खूप मोठी सुट्टी मिळाली आहे. पण सगळीकडेच जरा काळजीचे वातावरण असल्याने घरी बसणे अत्यावश्यक झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे, जिम – मॉल बंद असल्याने आता करणार तरी काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे. पण या मध्येच आपले लाडके कलाकार त्यांचे काही छंद जोपासताना दिसत आहेत. त्यामधील एक आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेतील सिद्धी – शिवा म्हणजेच विदुला आणि अशोक.
आता ते आपआपल्या घरी परत गेले असून सिद्धीला झाडांची विशेष आवड आहे आणि त्यामुळेच ती आता काही वेळ झाडांची काळजी घेण्यामध्ये देणार आहे. झाडे लावा. झाडे जगवा असा संदेश आपण नेहेमीच सर्वांना देत असतो, विदुला देखील तिच्या प्रेक्षकांना हाच संदेश देणार आहे.
तर अशोक सध्या अवांतर वाचन, तब्येतेची विशेष काळजी घेणार आहे. ऐरव्ही शूटिंगमध्ये असल्याने काही गोष्टी करायच्या राहून जातात. बर्‍याचश्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आता यानिमित्ताने या बाबींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला आहे तर त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणार आहे असे अशोक म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *