Headlines

या वयातही काजोलचे रूप पाहून वेडे झाले लोक पण ऐनवेळी साडीने दिला धोका, कॅमेऱ्यासमोर झाली पंचाईत !

काजोल देवगन बॉलीवुडमधील सक्सेसफुल अभिनेत्रींपैकी एक आहे. का अजून नाही तिच्या अभिनयाने लाखो लोकांचे मनं जिंकली आहेत. काजोलने आत्तापर्यंत एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काजोलने तिच्या सुंदर अदांनी आणि अभिनयाने लोकांच्या मनात तिची वेगळी जागा निर्माण केली आहे.

काजोलचे वय एवढे असून सुद्धा अजूनही ती तितकीच सुंदर दिसते. काजोल आता सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असते ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून काजोल आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भरपूर बिझी आहे. प्रमोशनच्या दरम्यानच तिच्या फॅन्सना खुश करण्यासाठी काजोलने ट्रॅडिशनल लुक केला होता. पण यावेळेस काजोलने तिच्या फॅन्स ना नाराज केले, काजोलचा हा लुक तिच्या फॅन्सना एवढा खास आवडला नाही.

काजोलच्या या लुकसाठी तिला भरपूर ट्रोल केले गेले. यामध्ये काजोलने राखाडी रंगाची साडी नेसली होती ज्याला मरून रंगाचा पदर होता. या साडीला मोत्याची संपूर्ण बॉर्डर होती ज्यामुळे साडीला हेवी लूक येत होता. काजोल नेहमीप्रमाणेच या लुकमध्ये देखील सुंदर दिसत होती.

काजोलने या साडीवर काळ्या रंगाचा डीप नेक ब्लाऊज आणि मॅचींग नेकलेस देखील घातला होता. केसांचा बंद बांधला होता सोबत मॅचिंग ग्लिटरी मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला होता. काजोल या पूर्ण कार्यक्रमादरम्यान तिची साडी सांभाळतानाच दिसली. ती या साडीमध्ये अनकम्फर्टेबल दिसत होती. हे सगळे कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झाले आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे. काजोलचे अनेक फोटो व्हिडिओ आपण सोशल मीडियावर वायरल होताना पाहतो. परंतु या व्हिडिओसाठी तिला भरपूर ट्रोल केले जात आहे.

https://youtu.be/2LKMcymm4Jc

काजोलच्या वायरल होत असलेल्या व्हिडिओवर आपल्याला भरपूर कमेंट वाचायला मिळतील. भरपूर जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट देखील केल्या आहेत. एकाने लिहिले आहे ‘मॅडम घाईघाईतच साडी नेसत आल्या’ तर दुसऱ्याने लिहिलेले आहे ‘साडी नाही झेपत तर घालायची कशाला’ यासारख्या अनेक कमेंट्स या व्हिडिओवर केल्या जात आहेत. या नवीन चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आल्या होत्या.

काजोलने इंडस्ट्री मध्ये काम करायला लागल्यापासूनच लोकांच्या मनावर आपली एक वेगळी छाप पाडली आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रितिक रोशन यांसारख्या बॉलिवूड मधल्या सगळ्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काजोलने चित्रपटात काम केले आहे. तानाजी, दिलवाले, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, बाजीगर, करन अर्जुन यासारख्या अनेक चित्रपटात काजोलने काम केले आहे. काजोल तिच्या फॅन्ससाठी आता सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह झाली आहे ती सतत तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !