एकेकाळी बॉलीवूडची ड्रीम गर्ल समजली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी आपल्या सर्वांना माहिती आहे. हल्ली जरी हेमा मालिनी बॉलीवूड क्षेत्रापासून लांब असल्या तरी नेहमी लाईम लाईट मध्ये राहत असतात. एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घालणारी हेमामालिनी आज ही तितकीच सुंदर दिसते हेमामालिनी अभिनेता चांगला करतेच याची आपल्या सर्वांना जाणीव आहे
परंतु हेमामालिनी यांच्या अंगी असलेली नृत्यकला उत्तम आहे पण हेमा मालिनी स्वतः शास्त्रीय नृत्य सादर करतात. गेल्या अनेक वर्षांपासून क्लासिकल डान्सर म्हणून त्यांची सगळी ओळख देखील बॉलीवुड क्षेत्रामध्ये आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हेमामालिनी सादरीकरण करताना दिसतात. अभिनयाच्या जोरावर हेमा मालिनी यांनी एकापेक्षा एक चित्रपट चाहत्या प्रेक्षक वर्गाला दिलेले आहेत.
हेमा मालिनी यांनी शोले या चित्रपटांमध्ये केलेल्या कामगिरीमुळे प्रसिद्ध झाल्या या चित्रपटापासूनच त्यांना अनेक जण ड्रीम गर्ल या नावाने ओळखले. आज ही बॉलीवूड त्यांच्या सौंदर्याचा आणि नृत्याचा दिवाना आहे. हेमा मालिनी अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवत असतात. अनेकदा तर सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहे. हेमा मालिनी स्वतः शास्त्रीय नृत्यांगना आहे, त्याचबरोबर हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देवल देखील एक उत्तम डान्सर आहे.
View this post on Instagram
“>
या दोघी माय लेकी अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र परफॉर्मन्स देखील सादर करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी चक्क बेली डान्स करत आहे. वयाच्या 74 व्या वर्षी बेली डान्स करणे हे त्यांच्या एकंदरीत कारकीर्द अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी अगदी उत्तम रित्या बेली डान्स करत आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ पाहिल्यावर या व्हिडिओचे कौतुक देखील केली आणि हेमामालिनी यांच्यावर प्रेम वर्षाव देखील केला.
या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी यांनी ब्लू आणि वाईट रंगाचे कपडे परिधान केले होते. या रंगाच्या कॉम्बिनेशन मुळे हेमामालिनी खूपच सुंदर दिसत होत्या. वयाच्या 74 व्या वर्षी देखील हेमामालिनी अगदी सोळाव्या वर्षात असणाऱ्या मुली सारखे डान्स करताना पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले आहे.
या आधी देखील अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देवल यांनी पुणे व नागपूर येथील एक दोन कार्यक्रमांमध्ये बेली डान्स केलेले आहे परंतु सोलो परफॉर्मन्स करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ म्हणावी लागेल. स्वतः या कार्यक्रमाचे काही फोटोज ईशा देवलने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केलेले आहेत. फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर हे फोटोज आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या डान्सची चर्चा देखील बॉलीवूडमध्ये रंगत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !