Headlines

पहिल्यांदाच दिसल्या ईशा अंबानींच्या जुळ्या मुली, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल !

अंबानी हे उद्योग क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. त्यांच्याबद्दलच्या बातम्या माहिती ही नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही सतत बॉलीवूडमधील वेगवेगळ्या पार्टीमध्ये देखील असते. हल्लीच तिला कियारा अडवाणीच्या रिसेप्शनमध्ये पाहिले गेले. तिथे ती तिच्या दोन लहान जुळ्या मुलांना घेऊन आली होती. यावेळेस तिच्या जुळ्या मुलांचा व्हिडिओ कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झाला. आणि आता तिच्याजवळ मुलांची झलक पाहण्यासाठी सोशल मीडियावर सगळीकडे हा व्हिडिओ वायरल होत आहे. ईशाच्या मुलांना पहिल्यांदाच कॅमेरा मध्ये पाहिले गेले आहे.

ईशा अंबानी आणि किआर अडवाणी दोघेही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळेच गिअरच्या वेडिंग रिसेप्शनसाठी ईशा तिच्या दोन्ही मुलांना घेऊन आली होती. मुंबईमध्ये ईशाल तिच्या मुलांसोबत त्यांच्या घरासमोरून बाहेर पडत असताना कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले गेले. यावेळेस ईशा खूप सुंदर दिसत होती. एका बाळाला तिने तिच्या हातात घेतले होते. ईशाने केस मोकळे सोडले होते ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती. ईशाच्या आणि त्यांच्या बाळाच्या सुरक्षेसाठी शेजारी बॉडीगार्ड देखील होते.

पार्टीच्या आधी ईशा अंबानी दिसली तिच्या मुलांसोबत – ईशा अंबानी पिरामल कुटुंबाची सून आहे. ईशाने तिच्या घरी एक मोठी पार्टी ठेवली होती. यामध्ये अनेक मोठमोठे व्यक्ती आले होते. बिझनेसमॅन, ऍक्टर, एक्ट्रेस या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पार्टीच्या आधी ईशा अंबानीला दोन मुलांना घेऊन गेटच्या बाहेर येत असताना पाहिले गेले. यामध्ये त्या मुलांचे चेहरे दिसले नाहीत पण त्यांची छोटी झलक दिसली. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी एक नर्स देखील तिच्यासोबत होती.

पिरामल हाऊसमध्ये आनंद पिरामल, ईशा अंबानी आणि त्यांच्या मुलांचे स्वागत करण्यासाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि पृथ्वी अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अतिशय भव्य अशी ही पार्टी होती. खास या लहान मुलांच्या स्वागतासाठी ही पार्टी ठेवली गेली होती. या पार्टीच्या वेळेस सगळेच फार आनंदात होते. सगळ्यांनी या पार्टीमध्ये खूप धमाल मस्ती केली.

२४ डिसेंबरला ईशा अंबानी पिरामलला जुळे बाळ झाले. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवले आहे. दोन्ही बाळ अजून फार लहान आहेत. आजी आजोबांनी या बाळांचे जंगी स्वागत केले. या दोघांच्या येण्यामुळे सगळे खूप खुश आहेत. १२ डिसेंबर २०१८ मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे लग्न झाले. खूप थाटामाटात हे लग्न केले होते आणि आता त्यांच्या मुलांचे स्वागत देखील तितक्याच थाटामाटात केले जात आहे.