Headlines

अभिनेता ‘विकी कौशल’ आणि अभिनेत्री ‘कॅटरिना कैफ’च्या लग्नाबाबत विकीच्या बहिणेने केला धक्कादायक खुलासा, जाणून घ्या !

गेले काही दिवस सोशल मीडियावर सतत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कॅफच्या चर्चांना उधाण आले आहे. पण खरे तर या दोघांच्या नातेवाईकांनाच या लग्नाबाबत काही माहित नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलची मावस बहिण डॉ. उपासना वोहराने तर त्या दोघांचे लग्न होणारच नाही असे सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कि त्यांच्या भावाचे म्हणजेच विकी कौशलचे लग्न कॅटरिना सोबत होणार नाही. त्यांच्या लग्नाबाबत चालणाऱ्या चर्चा या केवळ अफवा आहे.

भावाशी बोलणे झालेले …असे काहीच नाही – उपासनाने सांगितले कि सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या तयारींपासुन ते लग्नाच्या तारखांपर्यंत अफवा पसरत आहे. लग्न तर होणार नाही. असे असेल तर त्यांच्याकडुन त्याची घोषणा केली जाईल. बॉलिवुडमध्ये तर अशा अफवा पसरतच असतात आणि नंतर समजत की त्यापाठी सत्य काही वेगळेच होते. या सर्व काही वेळापुर्तीच्या अफवा आहेत. काही दिवसांपुर्वीच माझे विकीशी बोलणे झाले तो म्हणाला असे काही नाही. बाकी मी या गोष्टीवर आणखी काही बोलु इच्छित नाही. पण सध्या तरी लग्न होणार नाही.

डॉ. उपासना वोहरा यांचे लग्न याच वर्षी जुलै महिन्यात झाले होते. त्यावेळी विकी कौशल आणि त्यांच्या भावाने या लग्नात हजेरी लावलेली. उपासनाची डोली दोन्ही भावांनी मिळुन खांद्यावर उचललेली. उपासनाने सांगितलेल्या गोष्टीवर बॉलिवुड जाणकार त्यांच्या परिवाराकडुन ठेवण्यात येणारे सिक्रसी म्हणत आहे.

नो फोन पॉलिसी – विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाबाबत असे सुद्धा बोलले जाते की त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांना नो फोन पॉलिसीचा पाबंध लागणार आहे. या दोंघांनी लग्नाच्या वेळी १०० ऐवजी १५० सिक्योरिटी गार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फिमेल बॉडीगार्ड, मेल बॉडीगार्ड, सिक्योरिटी गार्ड व्यतिरिक्त ट्रॅफिक रेगुलेशन , सेलिब्रिटी एक्सेस यांसारख्या सर्व्हिस सुद्धा असतील.

विकी आणि कतरिना ७ ते ९ डिसेंबरच्या दरम्यान लग्न करणार असुन त्यासाठी राजस्थानच्या सवाई माधोपुर चा सिक्स सेंसस फोर्ट हॉटेल बुक केल्याचे म्हटले जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !