Headlines

अखेर शेवंताने सोडले मौन, या कारणामुळे सोडली रात्रीस खेळ चाले मालिका, जाणून तुम्हालाही धक्का बसेल !

गुढ, रहस्य, मनोरंजन आणि थरार अशा मालमसाल्यांनी भरलेल्या झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा सीझन सध्या टिव्हीवर प्रसारित होत आहे. या मालिकेचे पहिले दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये तुफान हिट ठरले. या मालिकेचे पुर्वीचे दोन सीझन रात्री साडेदहा वाजता प्रसारित व्हायचे मात्र यावेळचा सीजन हा रात्री ११ वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरते ते या कोकणातील चिरेबंदी वाडा, कोकणी भाषा आणि या मालिकेतील पात्र. त्यातही शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या जास्ती पसंतीस पडले. या पात्राची अदा, नजर, कसब काही औरच होती. आणि हे पात्र साकारले होते अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतुन शेवंता या पात्रामुळे अपुर्वा घराघरात पोहचली. नजरेने घायाळ करणाऱ्या शेवंताचे सौंदर्य प्रेक्षकांना नेहमीच आवडले त्यामुळे तिची वेगळी ओळख निर्माण झाली. पण अचानक अपुर्वाने शेवंताच्या पात्रातुन एक्झिट घेतली आहे.

तिचे असे अचानक मालिका सोडुन जाणे प्रेक्षकांच्या पचनी पडलेले नाही त्यामुळे सोशल मीडियावर प्रेक्षाकांच्या नीगेटीव्ह कमेंट येत आहे. या सर्व गोष्टीवर आता अपुर्वाने मौन सोडले असुन तिने तिच्या इन्टाग्राम हेंडलवरुन याचे उत्तर दिले आहे.
अपुर्वा म्हणाली, शेवंता मुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. तिच्याशी माझे एक वेगळे जिव्हाळ्याचे नाते आहे. शेवंता या पात्राने मला खुप काही दिले पण असे असुन देखील मला ही भुमिका सोडावी लागली. तुम्हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की मी ही मालिका का सोडली.. तुमचे माझ्यावरील तसेच शेवंतावरिल प्रेंम बघता या याचे खरे उत्तर देणे माझे कर्तव्य असल्याचे अपुर्वा म्हणाली.

पुढे तिने लिहीले कि मी शेवंता या भुमिकेसाठी १० किलो वजन वाढवले. त्यानंतर मला अनेक निगेटीव्ह कमेंट येऊ लागल्या. त्या सर्व गोष्टीला मी धैर्याने सामोरे गेले पण आता मालिकेतील काही नवखे कलाकरासुद्धा माझ्या वाढलेल्या वजनाची चेष्ठा उडवतात. त्यातल्या काही सतत केलेल्या कमेंटस् मुळे अपुर्वा दुखावली गेल्याचे ती म्हणाली. या प्रकरणी वरिष्ठांनी कारवाही देखील केली मात्र त्याचा काहीच फरक त्यांच्यावर पडलेला नाही.

याव्यतिरिक्त आमच्या मालिकीचे शुटींग सावंतवाडीला होते हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मी दरवेळी १२ तासांचा प्रवास करुन तेथे जायचे. तसेच तिथे तिला बोलवल्यावर केवळ एकाच दिवसाचे शुट झाल्यावर बाकीचे दोन तीन दिवस काही काम नसायचे. महिन्याभरात केवळ ६ ते ७ दिवसांचेचे काम असायचे त्यामुळे मला सारखा प्रवास करावा लागयचा. त्यात माझा महत्वाचा वेळ वाया गेल्याचे अपुर्वा म्हणाली.

या पुढे अपुर्वाने सांगितले की, या मालिकेच्या तिसऱ्या सिजनवेळी जेव्हा मला विचारणा केली तेव्हा केवळ ५ ते ६ दिवसांचे काम असेल असे मला सांगण्यात आले होते. त्यामुळे मी नकारही दिला होता. त्यावेळी चॅनलकडुन मला आणखी एक शो देण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले मात्र ते देखील पाळले गेले नाही. या काळात माझे बरेच आर्थिक नुकसान झाल्याचे अपुर्वा म्हणाली. यापुर्वीही तुझं माझं जमतयं या मालिकेत काम केल्याचा शेवटचा चेक सुद्धा मिळाला नसल्यचे अपुर्वाने तिच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

एकंदरीत केलेल्या कष्टाचा मोबदला न मिळणे, मालिकेतील नव्या कलाकारांकडुन चेष्ठा होणेस, अपमानाची वागणुक मिळणे या सर्व गोष्टीला कंटाळुन अपुर्वाने शेवंताला पात्राला निरोप देण्याचा निणर्य घेतला. मात्र या पुढे ती नव्या भुमिकांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येईल असे तिने म्हटले आहे. अपुर्वाचे मालिकेतुन असे अचानक एक्झिट घेतल्यामुळे प्रेक्षकांकडुन मालिके बाबतील नाराजीचे सुर व्यक्त होत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !