Headlines

सरकारच्या ५३ हजार रुपयांच्या मदतीने सुरु करा हा व्यवसाय होईल ३५ लाखापेक्षा जास्त कमाई, जाणून घ्या !

तुम्हाला जर बिझनेस करुन चांगले पैसे कमावयचे असतील तर तुमच्यासाठी हा खास लेख आहे. आज आम्ही तुम्हाला कडकनाथ कोंबड्याच्या बिझनेसबद्दल सांगणार आहोत. काळ्या रंगाच्या या कोंबड्याची जगात एक वेगळी ओळख आहे. या कोंबड्याचा जास्त व्यापार छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात होता. आदिवासीपाड्यात या कोंबड्यासा कालीमासी म्हटले जाते. हा कोंबडा नखशिकांत काळा असतो. या कोंबड्याचे मास आरोग्यासाठी फायदेशीर असते. कडकनाथच्या औषधी गुणांमुळे त्याची मागणी जास्त आहे.

कडकनाथला मिळाला जीआई टॅग – मध्य प्रदेश आणि छत्तीसगढसोबत देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा कडकनाथचा व्यापार केला जातो. सध्या छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशाची कृषि विज्ञान केंद्रे कडकनाथ कोंबडीची पिल्ले वेळेवर पुरवु शकत नाही यावरुन तुम्ही या कोंबड्याच्या मागणीचा अंदाज बांधु शकता. कडकनाथ कोंबड्याची उत्पत्ती मध्य प्रदेशाच्या झाबुआ जिल्ह्यामधुन झाली. त्यामुळे मध्य प्रदेशाच्या कडकनाथ कोंबड्याला जीआय टॅग मिळाला आहे. याचाच अर्थ कडकनाथ कोंबड्यासारखा दुसरा कोंबडा नाही.

कडकनाथ कोंबडा महाग का असतो – कडकनाथ कोंबडा आणि कोंबडीचे मांस , रंग आणि रक्त सुद्धा काळे असते. या कोंबड्याच्या मासांत आयरन आणि प्रोटीन सर्वात जास्त असते. तसेच त्याच्या मांसात कोलेस्ट्रोल सुद्धा कमी असते. त्यामुळेच ज्यांना ह्रदयासंबधी कोणते विकार असतील किंवा कोणाला मधुमेह असेल त्याच्या साठी कडकनाथ कोंबड्याचे मांस फायदेशीर असते. याच्या सेवनामुळे शरिराला अनेक पोषकतत्वे मिळतात. या कोंबड्याची मागणी आणि फायदे बघुन सरकार याचा बिझेनेस करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत करते.

कशा प्रकारे सरकार करते मदत – कडकनाथ कोंबड्याचे पालन करण्यासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ सरकार अनेक योजना राबवत आहेत. छत्तीसगढमध्ये ५३००० रुपये भरल्यावर सरकारकडुन कडकनाथ कोंबड्याची १००० पिल्ले , ३० कोंबड्या तसेच ६ महिने त्या कोंबड्याचे खाणे मोफत दिले जाते. तसेच त्यांच्या देखभालीचे , त्यांच्या टिकाकरणाची जबाबदारी सुद्धा सरकार उटलते. कोंबडे मोठे झाल्यावर त्यांच्या मार्केटींगची जबाबदारीसुद्धा सरकारच घेते. मध्य प्रदेश सरकारसुद्धा कोंबड्यांच्या पालनासाठी योजना आखत आहे.

या कोंबड्याचा व्यवसाय कसा सुरु करावा – तुम्हाला जर कडकनाथ कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर कृषि विज्ञान केंद्रातुन या जातीच्या कोंबड्यांची पिल्ले घेऊ शकता. या मध्ये काही जण १५ दिवसांचे पिल्लु घेतात तर काहीजण एका दिवसाचे पिल्लु सुद्धा घेऊन जातात. कडकनाथ चे पिल्लु ३ ते ४ महिन्यांनंतर विक्रीसाठी तयार होते. कडकनाथ कोंबडीच्या पिल्लाची किंमत ७० ते १०० रुपये असते. तर त्याच्या अंड्य़ांची किंमत २० ते ३० रुपये असते.

किती फायदा होतो – बाजारात कडकनाथ कोंबडीची किंमत ३ ते ४ हजार रुपये इतकी आहे. त्याचे मांस ७०० ते १००० रुपये प्रति किलो दराने विकले जाते. हिवाळ्यात तर या कोंबड्याच्या मांसाची किंमत १००० ते १२०० रुपये किलो पर्यंत पोहचते. समजा तुम्ही सरकारकडुन १००० पिल्ले ५३००० रुपयांना खरेदी केली. एका कोंबड्यामधुन ३ किलो मांस निघाले तर हिवाळ्यात तुम्ही ३५ लाखांपेक्षा जास्त कमाई करु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – सदरची माहिती ही इंटरनेटच्या आधारे बनवली आहे याची पूर्ण माहिती हवी असल्यास या व्यवसायातील तज्ज्ञ मंडळींना भेटावे. आम्ही वरीलपैकी कोणत्याही गोष्टीची खात्री देत नाही.