प्रत्येक जण आपला पैसे कुठे ना कुठे चांगल्या ठिकाणी गुंतवू पाहत असतो, जेणेकरून भविष्यात त्याचा योग्य तो मोबदला त्या व्यक्तीला मिळेल. साधारणपणे, कोणत्याही गुंतवणुकीशी संबंधित जोखीम घटक असतो. कमी जोखमीसह चांगल्या परताव्यासाठी आपण पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. शेअर बाजारात जोखीम जास्त असेल तर परतावाही इतर गुंतवणूक उत्पादनांपेक्षा जास्त असतो. पण प्रत्येकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते.
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. आज आपण एक अशी गुंतवणूक पाहणार आहोत, ज्यात जोखीम नगण्य असते आणि परतावाही चांगला असतो. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव हा त्यापैकी एक गुंतवणुकीचा मार्ग आहे.
पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी – पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे, यामध्ये फक्त १०० रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, त्यात हवे तेवढे पैसे टाकता येतात. या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. तथापि, बँका सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडले जाते.
आपल्याला किती व्याज मिळेल ते जाणून घ्या – सध्या, आवर्ती ठेव योजनेवर ५.८% व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर १ एप्रिल २०२० पासून लागू झाला आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.
दर महिन्याला १०,००० टाकले तर १६ लाख मिळतील – जर आपण पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये १० वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये गुंतवले तर १० वर्षांनंतर ५.८% दराने १६ लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील. दरमहा गुंतवणूक – १०,००० , व्याज – ५.८% , मॅच्युरिटी – १० वर्षे, १० वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम = रु. १६,२८,९६३
आरडी खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी – या खात्यात नियमित पैसे जमा करत राहावे लागेल, जर पैसे जमा केले नाही तर आपल्याला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. ४ हप्ते चुकल्यानंतर खाते बंद केले जाते.
पोस्ट ऑफिस आरडीवर कर – आवर्ती ठेवींमधील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जातो, जर ठेव ४०,००० रु. पेक्षा जास्त असेल तर वार्षिक १०% दराने कर आकारला जातो. आरडी वर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते एफडी प्रमाणेच फॉर्म 15G भरून टीडीएस सूटचा दावा करू शकतात.
पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, सरकारी आणि खाजगी बँका देखील आवर्ती ठेवीची सुविधा प्रदान करतात. बँकांच्या आवर्ती ठेवी, बँक आरडी दर कालावधी
येस बँक 7.00% १२ महिने ते ३३ महिने, एचडीएफसी बँक 5.50% ९०/१२० महिने , ऍक्सिस बँक 5.50% ५ वर्षे ते १० वर्षे, एसबीआय बँक 5.40% ५ वर्षे ते १० वर्षे
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !